पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड शहराचे शिल्पकार व महाराष्ट्राचे लाडके माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार साहेब यांची दि. २२/०७/२०२६ रोजी जयंती आहे. त्यांच्या कार्याची आठवण शहराला नेहमीच स्मृरणात राहणारी असून सदैव प्रेरणादायी आहे. या जयंती निमित्य पुणे महानगरपालिकेच्या धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरात दि. २२/०७/२०२६ ते २८/०७/२०२६ पर्यंत “स्वच्छता सप्ताहाचे” आयोजन करण्यात यावे. अशी मागणी विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर यांनी आयुक्तांना निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील प्रत्येक प्रभागामध्ये नाले साफसफाई, ड्रेनेज चोकप, ओला-सुका कचरा गोळा करणे, राडारोडा उचलणे, औषधे फवारणी, रस्त्यांची रंगरंगोटी (फोरोसंन्ट पेंन्ट मार्किंग) नागरीकांच्या आरोग्याच्यादृष्टीने स्वच्छता मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात यावी. जेणे करुन शहर स्वच्छ व सुंदर दिसेल. याकरीता आपल्या नियंत्रणाखाली उप आयुक्त दर्जाच्या अधिकारी यांचेवर सर्वस्वी जबाबदारी निश्चित करण्यात येऊन दि. २२/०७/२०२६ ते २८/०७/२०२६ पर्यंत स्वच्छता सप्ताह साजरा करण्यात यावा, असेही ते या निवेदनात म्हटले आहेत.

























