पिंपरी प्रतिनिधी:-
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार व युवा नेते अतिश बारणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने सक्षम सोशल फाउंडेशन व अतिश बारणे युवा मंच तर्फे विविध समाजोपयोगी उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमांना भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार मा.श्री.विलास लांडे , रा.कॉं.पि.चि. शहर अध्यक्ष श्री.अजित गव्हाणे, कामगार नेते इरफान सय्यद, मा.श्री.संजय वाबळे, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे स्वीय्य सहाय्यक तेजस झोडगे, मा.नगरसेवक वसंत बोराटे, टाटा युनियन लीडर अध्यक्ष श्री.सचिन लांडगे, रा.कॉं.पि.चि.महिला शहर अध्यक्ष कविता ताई आल्हाट, मा. शिक्षण समिती सभापती श्री. धनंजय भालेकर, मा.नगरसेवक प्रविण भालेकर, कृषी उत्पन्न बाजार समिती मा.सभापती विलासशेठ कातोरे, मा. नगरसेवक आप्पा बागल, युवा नेते यश दत्ताकाका साने. हे मान्यवर उपस्थित होते.
महादेव मंदिर, बारणेवस्ती, मोशी येथे कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच महादेव मंदिर भजनी मंडळ, बारणेवस्ती, मोशी यांना मृदुंग, स्वर पेटी, वीणा,टाळ साहित्याचे वाटप करण्यात आले.

वाघेश्वर मंदिर बोऱ्हाडेवाडी व संजयगांधी नगर व बारणेवस्ती मोशी येथे वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी मा.नगरसेवक श्री.धनंजय आल्हाट,श्री.संभाजी बोऱ्हाडे, श्री.भानुदास बोऱ्हाडे, श्री.काळूराम बोऱ्हाडे, श्री.शांताराम बोऱ्हाडे,श्री.सुरेश बोऱ्हाडे,श्री. अजिंक्य बोऱ्हाडे, श्री.प्रकाश गव्हाणे,श्री.योगेश बारणे,श्री.दिपक बारणे, श्री. गोरक्षनाथ बारणे, श्री.शुभम आल्हाट, श्री.अक्षय बोऱ्हाडे,श्री.सतिश कदम श्री.सचिन बोऱ्हाडे, श्री.आकाश बोऱ्हाडे, श्री.वैभव बोऱ्हाडे इ. मान्यवर उपस्थित होते.
मोतीबिंदू शस्त्रक्रिया, रक्तदान शिबीर, मधुमेह व हृदय विकारांवर मोफत उपचार, बांधकाम कामगारांना सुरक्षा कीट वाटप, जेष्ठ नागरिकांना छत्री वाटप, ट्राफिक पोलिसांना रेनकोट वाटप, महिलांसाठी मोफत हाडांची तपासणी, घरकाम महिलांना सन्मान भेट, सफाई कर्मचार्यांना रेनकोट वाटप, भाजी विक्रेत्यांना छत्री वाटप. नागेश्वर विद्यालयातील मुलींचे हिमोग्लोबीन चेकअप व डॉ. प्रगती चौघुले यांनी मुलींना आहार व जीवनशैलीवर मार्गदर्शन केले. यावेळी विद्यालयाचे प्रा.दिलीप इचके सर, भारती फुगे मॅडम, सदाकाळ सर, योगेश बारणे, दिपक बारणे, आदिनाथ बारणे, अक्षय बोऱ्हाडे, सतिश कदम , सचिन बोऱ्हाडे, आकाश बोऱ्हाडे, वैभव बोऱ्हाडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
प्रिती इंग्लिश मिडीयम स्कुल गायकवाड वस्ती येथे तज्ञ डॉ. प्रगती चौघुले यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सर व हाडांची तपासणी करण्यात आली. यावेळी सौ.प्रिती मिसाळ मॅडम, प्रतिक मिसाळ, विध्यार्थी व शिक्षकवृंद इ. मान्यवर उपस्थित होते.
मोशी येथील १० वी व १२ वीतील गुणवंत विध्यार्थांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मा.महापौर संजोग वाघेरे, मा. नगरसेवक श्री.विक्रांत लांडे, मा. नगरसेवक श्री.मयूर कलाटे, श्री.नितीन सस्ते, संभाजी बोऱ्हाडे, हवेली बँक चेअरमन संजय बोराटे, रमेश गायकवाड, पिंटू (नाना) बोराटे, सखाराम बोऱ्हाडे, अक्षय आल्हाट, अमित इंगळे, प्रकाश बनकर, परमेश्वर आल्हाट, संदिप आल्हाट, ह.भ.प. दशरथतात्या बोराटे, इ. मान्यवर उपस्थित होते.
प्रभागातील लोकांच्या मनोरंजनासाठी चांडाळ चौकडीच्या करामती या विनोदी कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते.
























