पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड प्रभाग क्र.19 मधील आनंदनगर येथील रहिवाशांना काही दिवसांपासुन अघोषित भारनियमनाचा त्रास होत होता. त्या बददल त्यांनी स्थानिक मा. नगरसेवक शैलेश प्रकाश मोरे यांच्या कडे तक्रार केली.
या तक्रारीची दखल ताबडतोब घेत शैलेश मोरे यांनी सरळ प्रत्यक्ष जागी भेट दिली व रहिवाशांशी संवाद साधत अडचण समजाऊन घेतली. ज्या ठिकाणी लोकांना भारनियमनाचा त्रास होत होता त्या जागी असलेला विजेचा ट्रान्सफार्मर खराब झाला आहे आणि वारंवार वीज पुरवठा खंडीत होतो आहे असे रहिवाशांकडुन सांगण्यात आले.
त्या रहिवाशांची या अघोषित भारनियमनामुळे होत असलेली अडचण व तक्रार समजावून घेत मा. नगरसेवक शैलेश मोरे यांनी संबधित अधिकारी यांना त्वरीत तो ट्रान्सफार्मर बदलून त्या जागी नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात यावा अशी मागणी केली….
नगरसेवक शैलेश मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे त्या जागी नवीन ट्रान्सफार्मर बसवण्यात आला असून त्याठिकाणचा वीज पुरवठा सुरळीत झाल्याबद्दल स्थानिक रहिवाशांनी मा. नगरसेवक शैलेश मोरे तसेच महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले.