पिंपरी प्रतिनिधी:- सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात कधीतरी असे प्रसंग घडतात ज्यातून प्रसंग ज्या व्यक्तीवर ओढावला ती व्यक्ती कधी सावरु शकेल की नाही याची शाश्वती नसते परंतु अशा प्रसंगातून सावरण्याचे बळ देणारे देवदूत आपल्या अवतीभवती असतात आणि असेच देवदूत भेटले तीला म्हणजेच सरिताला (नाव बदलले आहे) चार महिन्यांपूर्वी चाकण येथील एका कंपनीत सरिता काम करत होती सगळं काही सुरळीत सुरू होते “तो’ दिवस तीच्या आयुष्यात अग्नी परीक्षाच घेऊन आला होता. पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी याची प्रचिती युवती आणि तीच्या घरच्यांना गेल्या चार महिन्यांत आली.
आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलचे डॉ. विक्रम वाघ आणि त्यांच्या टीमने कारखान्यातील दुर्घटनेमुळे कवटी व कानाचे आवरण निघालेल्या पंचवीस वर्षीय मुलीचे प्राण वाचवले.
पंचवीस वर्षीय सरिता (नाव बदलले आहे) चाकण येथील कारखान्यात मशिनजवळ वीजपुरवठा नसल्याने पीपीई किटशिवाय उभी होती. अचानक वीजपुरवठा सुरू झाला आणि तिचे केस मोटरजवळ ओढले गेले. केस मोटरमध्ये अडकले आणि ती मशिनमध्ये खेचली गेली. तिच्या पापणीच्या वरून तिच्या मानेच्या मागच्या बाजूला कवटीच्या आवरणाला दुखापत झाली. तिचा एक कान त्वचेसोबत दुसऱ्या कानाच्या मार्जिनपर्यंत खेचला गेला. या अपघातामुळे तिचा डावा कान पूर्णपणे निकामी झाला. सरिता पूर्णपणे भेदरलेल्या अवस्थेत होती आणि या अवस्थेत मोठ्या दुखापतीसह तिला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिची प्रकृती अतिशय नाजूक होती आणि हॉस्पिटलने तिला उच्च केंद्रात पाठवले, त्यामुळे तिला आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलच्या अपघात आणि आपत्कालीन विभागात आणण्यात आले. ‘‘आम्ही तिचे प्राथमिक उपचार केले आणि तिला सक्रिय केले. त्यानंतर तिला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. आणि तातडीने ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुन रक्तस्त्राव थांबवला, तिच्या कवटीला चिकटलेले ग्रीस, तेल, कण इत्यादी काढून टाकले आणि त्यावर पट्टी बांधली. पण ती हेमोडायनॅमिकली (अत्यंत) स्थिर होईपर्यंत तिची प्रकृत गंभीर होती,’’ असे डॉ. विक्रम वाघ, सल्लागार, प्लास्टिक सर्जन, आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटल यांनी पत्रकारांना सांगितले की ‘‘ती हॉस्पिटल मध्ये आणली तेव्हा खूप मोठ्या धक्क्यात होती. तिचा रक्तदाब सत्तरच्या पुढे नव्हता, त्यामुळे आम्हाला तिला आधार द्यावा लागला. त्यानंतर तिला व्हेण्टिलेटरवरून काढण्यात आले. ती शुद्धीवर आली आणि तिची प्रकृती काहीशी स्थिर झाली.’’
सरिता स्थिर झाल्यानंतर तिच्या स्किन ग्राफ्टिंग करण्यात आले. तिच्या आरोग्याच्या स्थितीनुसार प्रक्रिया करण्यात आल्या. सरिताची स्थिती स्थिर करण्यासाठी एक तास ते अडीच तासापर्यंत एकूण १४ प्रक्रिया करण्यात आल्या. प्रत्येक प्रक्रियेमध्ये तिचा काही प्रमाणात रक्तस्राव झाला, ज्यामुळे ती अशक्त झाली. तिचे आरोग्य खालावले आणि तिला अनेकवेळा आयसीयूमध्ये हलवण्यात आले. ६ मोठ्या व उर्वरित लहान प्रक्रिया करण्यात आल्या. त्यात तिच्या कवटीला छिद्र पाडण्याचा समावेश होता. मज्जापासून पृष्ठभागापर्यंत रक्त बाहेर काढण्यासाठी हे केले गेले. रक्तातील स्टेम सेल नवीन ग्रॅन्युलेशन लेयर वाढण्यास मदत करते, ज्यामुळे स्किन ग्राफ्टिंगसाठी उत्तम मदत होते.
डॉ. विक्रम वाघ म्हणाले, ‘‘आम्ही प्रक्रिया केली असली तरी त्वचेचा संपूर्ण भाग पूर्ववत होण्यासाठी ६ महिने लागले असते. म्हणून आम्हाला तिच्यासाठी जर्मनीमधून स्किन आयात करावी लागली. कंपनीने दयाळूपणा दाखवत एक नमुना दिला, तसेच एका नमुन्याचे बिल देखील दिले. हा खर्च तिच्या मालकांनी आणि आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलने उचलला. इतर स्क्रिन ग्राफ्ट जागेव्यतिरिक्त इतर ठिकाणी स्किनचा वापर करण्यात आला. हळूहळू तिची प्रकृती स्थिरावली. आणि ती बरी झाली आणि स्किन तिच्या त्वचेशी सामावून जाण्याकरिता आम्ही तिला एक आठवडा सामान्यपणे जीवन जगण्यास सांगितले.’’
पेशंट ची प्रतिक्रिया :- “मी जिवंत राहील का नाही ह्याबद्दल मला अपेक्षा नव्हती. डॉक्टरांनी मला शांत करून धीर दिला आणि माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. जेव्हा मी हॉस्पिटल मधून डिस्चार्ज झाले त्यावेळी मला माझ्यावर विश्वास बसत नव्हता की, मी माझ्या पायावर चालू शकते “ पेशंट सरिता (नाव बदलले आहे) साडेतीन महिने हॉस्पिटलमध्ये होती. केसांच्या कूपांची त्वचा गेल्यामुळे तिला केस नसले तरी आता तिच्या कवटीला त्वचेचा थर आहे आणि ती स्थिर झाली आहे. ती अजूनही दर २ आठवड्यांनी ड्रेसिंग करत आहे.



