शिवसेनेतील काही पदाधिका-यांची केलेली हकालपट्टी ही मागे घेतली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये उत्साह असून अतिशय ताकदीने, जोमाने राहुल कलाटे यांचा प्रचार सुरु केला आहे. त्यामुळे शिवसैनिक, वंचित बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते आणि संपूर्ण मतदारंसघातील जनतेच्या बळावर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास राहुल कलाटे यांनी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभेचे अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांची निवडणूक जनतेनेच हातात घेतली आहे. त्यांच्या समर्थनार्थ जनतेसह विविध संघटना पुढे आल्या आहेत. कलाटे यांना ब्राह्मण महासंघासह शहरातील विविध ३४ संस्था, संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्यामुळे कलाटे यांच्या पाठिशी जनता ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट होते. भाजप पक्षाचा ब्राह्मण समाजाबद्दलचा दृष्टिकोन बदलताना दिसतोय. तसेच पक्ष स्थापनेपासून ब्राह्मण समाजाचा द्वेष करणाऱ्या स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाला मत देण्यापेक्षा ब्राह्मण समाजाने राहुल कलाटे यांना मतदान करण्याचे आवाहन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि कसब्यातील उमेदवार आनंद दवे यांनी केले आहे.




