पुणे प्रतिनिधी :-
पुण्यातील प्रचाराची मुदत संपली असताना भाजपाच्या नेत्यांनी मतदारसंघात रात्री दहा वाजेपर्यंत प्रचार करत होते. भाजपाचे वरिष्ठ नेते, पालकमंत्र्यासह अनेक मंत्री पोलिसांच्या उपस्थितीत प्रचार व पैश्यांचे वाटप केले गेले त्यामुळे ही लोकशाहीची हत्या होत आहे. हा सगळा प्रकार निवडणूक आयोग, पोलिसांसमोर होत आहे. मात्र तरीही त्यांना निवडणूक आयोगाने नोटीसदेखील दिली नाही. पोलिसांकडून कार्यकर्त्यांना दमदाटीदेखील होत आहे. गुन्हेगार आणि पोलिसही त्यांच्यात सामील झाले आहेत, अशा संतप्त भावना व्यक्त करीत महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी सपत्नीक कसबा गणपती मंदिरासमोर धरणे धरले. रविंद्र धंगेकर यांनी केलेल्या मागणीची चौकशी करण्यात येईल, असे पोलिस उपायुक्त संदीप सिंह गील यांनी ठोस आश्वासन दिल्यानंतर धंगेकर यांनी आपले धरणे, उपोषण मागे घेतले.
कसबा पोटनिवणूकीचा २४ फेबुवारी हा प्रचाराचा शेवटचा दिवस होता. निवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर यांना मतदारसंघातील प्रत्येक कानाकोपर्यातून मतदारांचा त्यांना पाठींबा आहे. त्यामुळे भाजपाला आपला पराभव दिसून येत असल्याने प्रचाराची वेळ निघून गेल्यानंतरही भाजप नेत्यांनी पोलिसांसोबत मिळून कसब्यात पैसे वाटल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केला. या विरोधात सकाळी दहा वाजता कसबा गणपती मंदिरासमोर सपत्नीक धरणे धरले होते. यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी, माजी आमदार रमेश बागवे, अभय छाजेड, शहराध्यक्ष अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, पुजा आनंद, बाळासाहेब आमराळे, रमेश अय्यर, विक्रम खन्ना, सौरभ आमराळे, विजय खळदकर, राजेंद्र भुतडा, अमर गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, रुपाली ठोंबरे, गणेश नलावडे, अशोक राठी, राजेंद्र आलमखाने, प्रसाद गावडे, प्रदीप गायकवाड, सारिका पारिख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, प्रशांत बधे, गजानन पंडित, राजेंद्र शिंदे, विशाल धनवडे, संतोष भूतकर, मुकूंद चव्हाण, जितेंद्र निजामपूरकर, महेश पवार यांच्या सह पदाधिकारी, कायकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गेल्या 30 वर्षापासून माझ्या कार्यकर्त्यांना संभाळत असून कार्यकर्ते माझं घर आहे. त्यांना जर कोणी त्रास देत असतील तर ते मी सहन करणार नाही. मला चौकात गोळी मारा पण माझ्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नका, अशा संतप्त भावना यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केल्या. ते पुढे म्हणाले, मी नियम पाळतो आहे, पण समोरच्या पक्षाकडून नियम डावलून पैसे वाटले जात आहे. मी लोकशाहीसाठी आंदोलन करतो आहे असेही यावेळी ते म्हणाले.
प्रचार संपला तरीदेखील भाजपा नेते मंडळी, पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून घरोघरी प्रचार केला जात होता. तसेच भाजपाचे पदाधिकारी कसबा मतदार संघात पोलिसांच्या मदतीने पैसे वाटप करीत आहे. तसेच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना मतदार संघ सोडून बाहेर जाण्याचे सांगत पोलिस माझ्या कार्यकर्त्यांना दमदाटी करत आहे. गुन्हेगार आणि पोलिसही त्यांच्यात सामील झाले आहेत, असा आरोप यावेळी रविंद्र धंगेकर यांनी केला. पोलिस राजकीय एजंट म्हणून पैसे वाटप करतात, हे अनेकदा पुराव्यासहीत उघड केले आहे. पोलिसासमवेत ते भाजपा कार्यकर्त्यांचा बिनधास्तपणे वावर होत असल्याने भाजपाकडून सर्व यंत्रणाचा वापर होत असून हा लोकशाहीचा खून होत असल्याची संतप्त भावनादेखील यावेळी धंगेकर यांनी व्यक्त केली.
प्रदेश कॉंग्रेस उपाध्यक्ष व माजी आमदार मोहन जोशी म्हणाले, रविंद्र धंगेकर यांना कसब्यातून सर्वत्र मतदारांचा मोठा पाठिंबा दिसून येत आहे. त्यांच्या कामामुळे मतदारांकडून त्यांना पसंती आहे, त्यामुळे भाजपाच्या पायाखालची वाळू सरकली आहे. भाजपाच्या उमेदवारांचा पराभव दिसत असल्याने निवडणूक आयोगासह, पोलिस यंत्रणेचा वापर त्यांच्याकडून होत आहे. पोलिसांच्या यंत्रणेत सुरक्षितपणे मतदारांना पैसे वाटण्याचा प्रकार भाजपाकडून होत आहे. मतदारांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करुन कमीत कमी मतदान होण्यासाठी त्यांच्याकडून संपुर्ण प्रयत्न होत आहे. यासंदर्भात आम्ही चित्रफीतीचे पुरावेदेखील दिले आहेत. मात्र पोलिस प्रशासन व निवडणूक आयोगाकडून कोणती कारवाई केली जात नाही. मतदार संघातील भाजपाचे झेंडे, पोस्टर काढले नाहीत, याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मतदार संघात पैशांचे महापूर भाजपाकडून होत आहे. पुणे शहरात युपी-बिहार सारखे वातावरण भाजपाने केले आहे. आम्ही संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. या निवडणूकीतून जतना भाजपाला नक्कीच धडा शिकवतील. आमच्या दिलेल्या तक्रारची चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आम्ही उपोषण मागे घेतले असेही यावेळी जोशी यांनी सांगितले.
कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले, कसब्यात मतदारांना पैसे वाटून लोकशाहीचा गळा घोटण्यात येत असून यात पोलिसांचा देखील समावेश आहे. पैसे वाटण्याची व्हिडियो क्लिप पुरावे म्हणून देण्यात आले आहेत. मात्र, तरीही कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिक दहशतीखाली आहेत. पैसे वाटण्याचे प्रकार त्वरित थांबवावे व संबंधितांवर कारवाई करण्यात यावी.




