मावळ प्रतिनिधी:-
भारताचे कर्तृत्ववान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्ताने मोदी सरकारचे ऐतेहासिक निर्णय, विकासकामे व जनहितार्थच्या योजना यांची माहिती जनतेपर्यंत पोहचावी, याकरिता देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघांमध्ये महा-जनसंपर्क अभियान व मोदी @9 चे कार्यक्रम सुरू आहेत.मावळ येथे लोकसभा मतदार संघांतर्गत भारतीय जनता पार्टीच्या ‘सोशल मीडिया इंफ्ल्युएसंर संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. याच अभियानाच एक भाग म्हणून मावळ लोकसभा मतदारसंघातील सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्तींचे ‘सोशल मीडिया इंफ्ल्युएसंर संमेलन’ पिंपळे सौदागर येथील प्रसिद्ध ‘हॅाटेल गोविंद गार्डनच्या बॅंक्वेट हॅाल’ मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाले. मावळ लोकसभेचे संयोजक बाळा भेगडे यांनी उपस्थित ‘सोशल मेडिया इंफ्ल्युएसंर’ ना मार्गदर्शन केले. यावेळी चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप, भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, माजी महापौर माई ढोरे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस ॲड.मोरेश्वर शेडगे, सोशल मेडिया इंफ्ल्युएसंर संमेलनाचे मावळ लोकसभेचे संयोजक शत्रुघ्न काटे, पिंपरी विधानसभा संयोजक राजेश आण्णा पिल्ले, मावळ विधानसभा संयोजक सागर शिंदे, चिंचवड विधानसभा संयोजक अमेय देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत आण्णा नखाते, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, माजी नगरसेविका उषा मुंढे, अश्विनी चिंचवडे, आरती चौंधे, शारदा सोनावणे, निर्मला कुटे, माजी नगरसेवक संदिप आण्णा कस्पटे, राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, बाबा त्रिभुवन, तानाजी बारणे यासंह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व मावळ लोकसभेतील ‘सोशल मेडिया इंफ्ल्युएसंर’ मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी पीयुष पाटील, कुणाल मोरे व प्रणय राज गोस्वामी या सोशल मेडिया इंफ्ल्युएसंरनी उपस्थितांशी सोशल मिडियाचा वापर कसा केला पाहिजे याची माहिती दिली व आपले अनुभव सांगीतले.




