पिंपरी प्रतिनिधी:- पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटी वरिष्ठ उपाध्यक्ष श्री दिलीप पांढरकर यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ नेते व खासदार माननीय श्री राहुल गांधी तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री नानासाहेब पटोले यांच्या वाढदिवसानिमित्त आकुर्डी येथील काँग्रेसचे जनसंपर्क कार्यालय या ठिकाणी भव्य रक्तदान शिबिर मेडिकल चेकअप व नेत्र चिकित्सा मोफत चष्मे वाटप कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात माननीय काँग्रेसचे वरिष्ठ नेते शहरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रमुख उपस्थिती श्रीमती शामला ताई सोनवणे माजी अध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महिला कमिटी, बिंदूताई तिवारी उपाध्यक्षा महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी, सायलीताई नढे महिला शहराध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटी, सौ प्रतिभा कांबळे औद्योगिक सेल शहराध्यक्षा सौ शितलताई कोतवाल प्रभारी असंघटित काँग्रेस महाराष्ट्र स्वातीताई शिंदे उपाध्यक्षा महिला काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश , आशा भोसले उपाध्यक्षा पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटी, दिलीपशेठ पांढरकर कार्याध्यक्ष पिंपरी चिंचवड शहर कॉंग्रेस कमिटी, एडवोकेट अनिरुद्ध कांबळे वरिष्ठ उपाध्यक्ष पिंपरी चिंचवड काँग्रेस कमिटी, वैशालीताई परदेशी माजी नगरसेविका उपाध्यक्ष सेवा दल महाराष्ट्र काँग्रेस पिंपरी चिंचवड महानगरपालिका माजी नगरसेवक श्री तुकाराम भोंडवे, श्री राजाभाऊ गोलांडे, श्री विश्वास गजरमल, श्री अख्तरभाई चौधरी, बबनराव जाधव दत्तात्रय दातीर पाटील , किरण नढे , अमित पांढरकर, एडवोकेट राजेंद्र काळभोर, सचिन गायकवाड, रवींद्र कांबळे, बाबुलाल वाघमारे, संदेश नवले, आबासाहेब खराडे, मयूर जयस्वाल सरचिटणीस महाराष्ट्र युवक काँग्रेस , मकरध्वज यादव, गौरव चौधरी, अमरसिंह नाणेकर, शैलेश वाल्हेकर, दिनकर भालेकर, पै किसन भालेकर, राहुल जाधव, गणेश साने सूत्रसंचालन हर्षवर्धन पांढरकर, सुरेश लिंगायत हे उपस्थित होते.




