पुणे प्रतिनिधी:-
माणिकचंद ऑक्सिरीच कंपनीच्या पुनीत बालन यांना दहिहंडी उत्सवा दरम्यानच्या कालावधीत अनधिकृत फलक, बोर्ड, बॅनर, फ्लेक्स इ. लावून पुणे शहरातील सार्वजनिक मालमत्ता विद्रुपीकरण केल्याने 3 कोटी 20 लाखांचा दंड भरण्याचे आदेश पुणे महापालिका अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दिले आहेत.
यासाठी 2 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. माधव जगताप यांच्या आदेशानुसार पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम २४४,२४५ व त्यानुसार अस्तित्वात आलेल्या महाराष्ट्र महानगरपालिका आकाशचिन्हे (स्काय साईन) व जाहिरात प्रदर्शित करण्याचे नियमन आणि नियंत्रण नियम, २०२२ चे तरतुदीनुसार जाहिरात फलक उभारण्यासाठी पुणे महानगरपालिकेची रितसर पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. ती न घेतल्यामुळे
तसेच महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध करण्याकरीता अधिनियम, १९९५ चे तरतुदीनुसार आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग केल्यामुळे हा दंड ठोठावला आहे.




