चिंचवड प्रतिनिधी:-
शनिवार दिनांक सात ऑक्टोंबर रोजी आमदार अश्विनी जगताप यांनी यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या बांधकामाच्या कामाची पाहणी करून कामाचा आढावा घेतला. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या बांधकामासाठी आ. अश्विनी जगताप यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन यशवंतराव चव्हाण स्मारक समितीच्या कामकाजास मदत करणे बाबत विनंती केली होती. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महापालिकेने नुकतेच यशवंतराव चव्हाण स्मारकाच्या बांधकामास पाच कोटी रुपयांच्या अनुदानास मंजुरी देऊन त्यातील अडीच कोटी रुपयांचा पहिला हप्ता नुकताच दिला आहे. याबाबत बांधकामाची पाहणी करण्यासाठी आमदार अश्विनीताई जगताप यांनी यशवंतराव चव्हाण स्मारक समितीस भेट देऊन पाहणी केली. याबाबत त्यांनी बांधकाम पाहून आनंद व्यक्त केला आणि इथून पुढेही अजून सहकार्य करून पुढील निधी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली.

यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष श्री सुनील जाधव, सचिव श्री रामदास तावरे, खजिनदार श्री विलास भोसले, सहसचिव श्री संतोष जगताप, सह खजिनदार श्री अशोक चव्हाण तसेच श्री मधुकर बाबर,श्रीमती सुरेखाताई कदम, श्री अशोक पाटील, श्री शिरीष पाटील, सौ दैवताताई जाधव आर्किटेक्ट हर्षदा ढेरे यांच्या सोबतच स्मारक समितीचे कार्यकर्ते तात्या सपकाळ हेही उपस्थित होते.




