राजगुरुनगर प्रतिनिधी:-
पुणे नाशिक हायवे गेली अनेक वर्षे अनेक कारणांमुळे चर्चेत आहे मग ती पुणे नाशिक रेल्वे असो की रस्त्याचे रुंदीकरण असो मागील पाच वर्षांपूर्वी पर्यंत पुणे नाशिक हायवे वरील प्रवास म्हणजे मृत्यू शी भेट असे समीकरण झाले होते. पण नव्याने खासदार झालेल्या डॉ. अमोल कोल्हे यांनी संसदेत पुणे नाशिक हायवेच्या दुरावस्थेबाबत वेळोवेळी प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकार कडे पाठपुरावा करून रस्त्याच्या रुंदीकरणाचे रखडलेले काम मार्गी लावले आणि राजगुरुनगर येथील रुंदीकरण, बायपास तसेच मंचर, कळंब, नारायणगाव, आळेफाटा येथील बायपास रस्त्यांची कामे मंजूर करुन आणून प्रशासनाकडून ती पुर्ण ही करून घेतली. खासदारांचे ते प्रयत्न निष्फळ ठरले की काय असे वाटू लागले आहे.
मंचर येथून पुण्याकडे जाणाऱ्या राजगुरुनगर बायपास रस्ता जिथून सुरू होतो तिथेच पहिला अंडरपासच्या पुलाचा भराव खचला असून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने त्यावरच डांबर टाकून निकृष्ट दर्जाचे काम लपविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे.

कारण अजूनही बायपासची कामे अर्धवट आहेत. चारही बायपास रस्त्यावर लावलेले लाईट अर्धे सुरू अर्धे बंद दिसतात. तसेच बायपास रस्ते वाहतूकी साठी खुले होऊन सहा महिने ही झाले नाहीत तोच काही ठिकाणी पुलांचे भराव खचले असून रात्रीच्या वेळी रस्ता वर खाली असल्याने दुचाकींचे अपघात होत आहेत. त्यामुळे सदर निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करून ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी नागरिक करत आहेत. तसेच संबंधित इंजिनिअर अधिकाऱ्यांवर ही कारवाई करण्यात यावी.




