पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मोशी या ठिकाणी असलेल्या कचरा डेपोतील कचऱ्यांचा मोठा ढिग आज, बुधवार, दिनांक ८ जुलै, २०२६ रोजी दुपारी शेजारील इमारतीवर आल्याने ती इमारत कोसळून त्याखाली काही जण अडकल्याची दुर्घटना घडली आहे. याला पुर्णपणे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पर्यावरण विभागाचे प्रमुख-श्री.संजय कुलकर्णी हे जबाबदार आहेत.
गेल्या अनेक दिवसांपासून वेस्ट टू एनर्जी हा प्रकल्प बंद आहे. त्यामुळे कचऱ्याचे ढिग वाढले, आत्तापर्यंत बायोमायनिंग टप्पा-१, टप्पा-२ मध्ये शेकडो कोटींच्या निविदा काढण्यात आल्या. परंतू कचऱ्यांचे डोंगर वाढतच गेले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा पर्यांवरण विभागाला फक्त निविदा काढणे, पुन्हा देखभाल दुरुस्तीसाठी निविदा काढणे यामध्येच रस असल्याचे दिसून येते. या विभागात भरपूर प्रमाणात भ्रष्टाचार असल्याने त्या विभागाची सखोल चौकशी व्हावी.
तसेच आत्तापर्यंत मोशी कचरा डेपो मध्ये अनेक प्रकल्प राबविले आहेत. त्यापैकी अनेक बंद सुध्दा पडले आहेत, यासाठी पिंपरी चिंचवड मनपाचे हजारो कोटी रूपये वाया गेले आहेत. हा भ्रष्टाचार थांबविण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालावे व दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे उबाळे यांनी केली आहे.
























