पिंपरी प्रतिनिधी :-
महाराष्ट्रात सध्या मराठा आरक्षणावर राजकीय खलबते सुरू आहेत. सर्व स्तरातील लोकांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. त्यात लोकप्रतिनिधी ही आलेच नुकतेच शिरुर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पिंपरी चिंचवड येथील शिरुर लोकसभेत येणाऱ्या भागातील कामांचे लोकार्पण केले. त्यानिमित्ताने ते पिंपरी चिंचवड येथे आले असता पत्रकारांनी त्यांना मराठा आरक्षणावर त्यांचे मत विचारले असता त्यांनीही लगेचच त्याला प्रतिसाद देत सांगितले की माझा कालही मनोज जरांगे यांना पाठिंबा होता आणि आजही आहे. सरकारने त्यांना शब्द दिला आहे तो लवकरात लवकर पूर्ण करण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत.




