भिमाशंकर प्रतिनिधी:-
सालाबादप्रमाणे याही वर्षी भिमाशंकर अभयारण्यामध्ये दिनांक २२/०५/२०२४ व २३/०५/२०२४ रोजी बुद्ध पौर्णिमे निमित्त भिमाशंकर अभयारण्य जंगलात प्राणी निरीक्षण / निसर्गानुभव कार्यक्रम घेण्यात आला. बुध्द पौर्णिमे निमित्त भिमाशंकर अभयारण्यात प्राणी निरिक्षण / निसर्गानुभव कार्यक्रमासाठी चौरा क्र.१, चौरा क्र.२, वाजेवाडी, वीरतळे, घाटघर, भटटीचे रान, उघडी कळमजाई या पाणवठ्यावर निसर्गानुभवासाठी एकुण २० ते २५ लोकांनी सहभाग नोंदविला, बाहेरून आलेल्या लोकांनी सदर पाणवठ्याजवळ तयार केलेली मचाण / लपण मध्ये बसून निसर्गाच्या रात्रीचा अनुभव घेतला व निसर्गानुभवामध्ये शेकरू, सांबर, ससा, डुक्कर, खवले, मांजर, भेकर, मोर, उदमांजर इत्यादी प्राणी पक्षी या निसर्ग प्रेमींनी प्रत्यक्षात पाहिले.
तसेच प्राणी गणना करत असताना भिमाशंकर अभयारण्य हे घाटमाथ्यावरीती असल्याने येथे धुक्याचे प्रमाण जास्त असल्याने प्राणी निरिक्षण / निसर्गानुभव करताना थोडासा अडथळा आला पण वनकर्मचारी आणि नागरिकांनी चिकाटीने हे निरीक्षण केले तसेच ७ ते ८ दिवस आधी पाऊस झाल्या कारणाने ठिक ठिकाणी पाणी असल्यामुळे पाणवठयावर प्राणी व पक्ष्यांची संख्या कमी दिसून आली. श्री. तुषार चव्हाण मा. उपवनसंरक्षक, वन्यजीव पुणे व श्रीमती स्नेहल पाटील विभागीय वन अधिकारी पुणे यांचे मार्गदर्शनाखाली सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते.




