चिंचवड प्रतिनिधी:-
देशातील लोकसभा निवडणूक संपताच राज्यातील विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरू झाले आहे. चिंचवडमध्ये महायुतीत विधानसभेवरून कलगीतुरा सुरू असतानाच शिवसेनेचे बंडखोर राहुल कलाटे, जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर, नाना काटे, चंद्रकांत नखाते, ओबीसीचे नेते सतीश दरेकर यांनी दंड थोपटले आहेत.
दिवंगत आमदार लक्ष्मण जगतापांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीपासून लढण्याच्या बेतात असलेल्या शंकर जगतापांना काही केल्या आमदार व्हायचेच आहे. त्यासाठी वहिनींनी किती ठामपणे सांगितले तरीही शंकर जगताप फडणवीसांकडे ‘वशिलेबाजी’ करून तिकिट आणू शकतात. तेव्हा, अश्विनी जगताप या काही सहजपणे आपले तिकिट जाऊ देणार नाहीत, असेच आताचे चित्र आहे. त्यातच महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे यांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहे. चिंचवडमधील राष्ट्रवादीचे नेते नाना काटे , माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तापकीर काय करणार, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. तसेच जेष्ठ नेते मा. नगरसेवक भाऊसाहेब भोईर हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नेते असून नगर सेवक म्हणून अनेक वेळा निवडून आलेले आहेत.२००९ मध्ये चिंचवड विधानसभेची निवडणूक लढविली होती. त्यांनी प्रभागातील अनेक प्रश्न मार्गी लावले असून पिंपरी चिंचवड शहरासह महाराष्ट्रात सांस्कृतिक विभाग चांगले काम आहे. संस्कृती चळवळ जिवंत ठेवण्याचे भाऊसाहेब भोईर यावेळी २०२४ मध्ये चिंचवड मतदार संघातून ते निवडणूक लढवण्यास तीव्र इच्छुक आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी विरोधी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र तात्या तापकीर हे माजी विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी विरोधी पक्ष नेते आसताना कचऱ्या साठी केलेले आंदोलन विशेष गाजवले आहे. त्यांनी महानगर पालिकेचे स्व:त नगरसेवक सताना प्रभागासह शहरातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केला आहे. तापकीर हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटातुन तुतारी या चिन्हावर चिंचवड मतदारसंघातून म्हणून निवडणूक लढविणार आहेत.
माजी नगरसेवक सतिश दरेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे ओबीसी सेल प्रदेश उपाध्यक्ष व कुंभार समाज सामाजिक संस्थेचे प्रदेश अध्यक्ष पद त्यांच्याकडे आहे. चिंचवड विधानसभेतील ओबीसी समाजाचे नेते म्हणून पाहिले जाते. चिंचवड विधानसभेत ओबीसींची अंदाजे दोन लाख मतदार आहेत मात्र ओबीसी उमेदवार आता पर्यंत कोणत्याही प्रस्थापित पक्षाने दिलेला नाही, त्यामुळे ते इच्छुक आहेत.
राहुल कलाटे पुन्हा लढले, तर चिंचवडला २०२४ ला पुन्हा मोठा उलटफेर होणार आहेत. गेल्यावर्षीच्या चिंचवडच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी करीत ते अपक्ष म्हणून लढले. त्यामुळे आघाडीच्या हाता तोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला गेला. कारण कलाटेंनी ४४ हजार ११२ मते घेतली. तर, विजयी उमेदवार भाजपच्या अश्विनी जगताप या ३६ हजार १६८ मतांनी विजयी झाल्या. त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नाना काटे यांनी ९९ हजार ४३५ मते घेतली होती. त्यामुळे २०२४ ला कलाटे पुन्हा रिंगणात उतरणार असे दिसते,
एकंदरीतच चिंचवड विधानसभेत तगडे इच्छुक पाहता ही निवडणूक जगताप कुटुंबाला जड जाणार असे दिसतेय.




