भोसरी प्रतिनिधी :-
भोसरी विधानसभेचे अनभिषिक्त सम्राट असलेल्या आमदार महेश लांडगेंच्या विरोधात वातावरण तयार झाले आहे ज्यांच्या जिवावर ते २०१४ ला अपक्ष व २०१९ ला भाजपच्या तिकीटावर निवडून आले तेच आता बरोबर नसल्याने हि निवडणूक आमदार महेश लांडगे यांना जड जाणार आहे. याचा फायदा घेण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. त्यातच भोसरीचे प्रथम आमदार असलेले विलास लांडे हे निवडणूक लढवणार नसल्याचे बोलले जात आहे ते त्यांचे निकटवर्तीय असलेले नगरसेवक व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांना महाविकास आघाडी कडून लढण्यासाठी तयार करत आहेत.तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून सुलभा उबाळे ही तयारी करत आहेत. भोसरीतील जैष्ठ नगरसेवक व भाजपचे निष्ठावान विलास मडिगेरी भाजपकडून प्रमुख दावेदार आहेत. तसेच मा. नगरसेवक लक्ष्मण सस्ते हे ही निवडणूकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे तर भोसरी विधानसमेत ओबीसी, मुस्लीम व दलित समाजाची सर्वांत जास्त मते आहेत. त्यामुळे ओबीसी चेहरा म्हणून प्रस्थापित पक्षांकडून माजी महापौर वैशाली घोडेकर (लोंढे) यांचे नाव ऐनवेळी पुढे येऊ शकते, त्यामुळे भोसरी विधानसभा मतदार संघातील निवडणूक यावेळी चुरशीची होणार आहे.
भोसरी मतदार संघात महापालिकेने केलेल्या कामाचे श्रेय आमदार महेश लांडगे घेत असल्याने भोसरीतील नगरसेवक नाराज आहेत. त्यामुळे या गोष्टीचा फायदा घेण्यासाठी विरोध एक झाले आहेत, अजित गव्हाणे हे उच्च शिक्षित आणि सरळ स्वभावाचे असल्याने यावेळी ते आमदार की लढवणार आहेत,ते सलग चार वेळा नगरसेवक म्हणून भोसरीतून निवडून आलेले आहेत, ते महेश लांडगे यांच्या अगोदर २००७ ला स्थायी समिती अध्यक्ष झालेले आहेत तसेच भोसरीतील प्रत्येक कार्यकर्ता आणि जुने जाणत्या लोकांच्या मुखी अजित गव्हाणे यांचे नाव पुढे येते तर सुलभा उबाळे ह्या २००९ ला भोसरी विधानसभेतून स्वपक्षीय आणि मित्र पक्षातील गद्दारांमुळे फक्त १२०० मताने पडल्या होत्या त्यामुळे त्याही यावेळेस शिवसेना उबाठा गटाकडून इच्छुक आहेत, २००७ ला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर झालेल्या डॉ.वेशाली घोडेकर (लोंढे) याही या वेळी प्रस्थापित पक्षांकडून ऐनवेळी आमदारकीच्या रिंगणात उतरू शकतात, तर भाजपचे निष्ठावंत असलेले विलास मडेगिरी यांच्या घराला ही लोकांनी तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून दिले आहे, कामाच्या बाबतीत त्यांचा कोणीच हात पकडू शकत नाही, ते सदैव प्रभागातील नागरिकांची कामे करताना दिसतात. त्यामुळे तेही भाजपतर्फे भोसरी मतदार संघात प्रमुख दावेदार आहेत, तर समाविष्ट गावातील मोशी येथील नगरसेवक व आमदार महेश लांडगे यांचेच एकेकाळचे सहकारी आणि कट्टर समर्थक लक्ष्मण सस्ते हे लोकाग्रहास्तव महाविकास आघाडीकडून दावेदार उमेदवारी घेण्यासाठी तीव्र इच्छुक आहेत. सस्ते हे पहिल्यांदाच निवडून आले असले तरी ते युवकांमध्ये प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध झाले आहेत कारण मुळातच शेतकरी कुटुंबातील असल्याने बैलगाडा शर्यती मुळे ते घराघरात पोहोचले आहेत. चिखली, मोशी, चऱ्होली, या समाविष्ट गावांतील मताधिक्यावरच महेश लांडगे हे २०१४ आणि २०१९ ला निवडून आले आहेत. या तिन्ही गावातील लांडगे यांच्या वर रोष असलेले नगरसेवक आणि विरोधक यांची मोट बांधण्याचे काम मोठ्या ताकदीने करत आहेत. त्याचा फायदा लक्ष्मण सस्ते यांना होऊ शकतो. त्यामुळे येणारी २०२४ ची विधानसभा निवडणुक आमदार महेश लांडगेंना सोपी नाही असेच म्हणावे लागेल.




