पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड मधील दत्तनगर,राम नगर, विद्या नगर परिसरात भटक्या आणि विनापरवाना पाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून तेथील नागरिक, शालेय विद्यार्थी, वृध्द हे त्या कुत्र्यांच्या दहशतीखाली आहेत. घरातून बाहेर पडले की आठ दहा कुत्रे आजुबाजुला फिरत असतात त्यातील काही विनाकारणच अंगावर जाऊन हल्ला करतात तसेच दुचाकी वाहनचालकांना ही अपघातांना सामोरे जावे लागते आहे. अपघातांमुळे अनेक दुचाकीस्वारांना अपंगत्व ही आले आहे. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेचा पशुवैद्यकीय विभाग मात्र प्राणी मित्र संघटनांच्या दबावामुळे कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाहीत त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण असून भटके आणि विनापरवाना कुत्रे पकडण्यासाठी लवकरात लवकर कारवाई करावी.
दत्तनगर, रामनगर, विद्यानगर हा झोपडपट्टी बहूल भाग असून येथे बैठी घरे चाळी मोठ्या प्रमाणावर आहेत तेथील नागरिकांनी,दुकानदारांनी विनापरवाना कुत्रे पाळले असून ते रस्त्यावरच मोकाट सोडलेले असतात नागरिक त्रस्त असून अशा विनापरवाना कुत्र्यांवर लवकरात लवकर कारवाई करावी. अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.























