पिंपरी प्रतिनिधी:-
शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,
मा. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला समन्वयिका पिंपरी चिंचवड वैभवीताई घोडके व शिवसेना प्राधिकरण विभाग, राजेश्वरी फाउंडेशन यांच्या माध्यमातून प्राधिकरण पोस्ट ऑफिस मधील पंचवीस कर्मचारी यांना रेनकोट वाटप करण्यात आले व त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास शिवसेना शहप्रमुख ॲड सचिन भोसले, महिला उपजिल्हा संघटिका वैशाली मराठे, उपशहरप्रमुख अमोल निकम,रजनीताई वाघ, ज्योतीताई भालके, सुलोचना खुणे,मीना जाधव, उपविभागप्रमुख तेजस पवार, प्रज्ञा दुर्वे, उमा खुडे, सुरेखा गायकवाड, अपर्णा गावंडे, शितल बैरागी, शुभांगी कुलजरणी, हर्षदा माळी, प्रज्ञा उत्तेकर हे सर्व शिवसैनिक व राजेश्वरी फाउंडेशन सर्व महिला सदस्य उपस्थित होत्या. सदर उपक्रम प्राधिकरण पोस्ट ऑफीस से 27 प्राधिकरण येथे शनिवार दि. २७/७/२४ रोजी सकाळी १० वाजता पार पडला.