पिंपरी प्रतिनिधी:-
मा.उपमहापोर डब्बू आसवानी यांनी राबविलेले हे उपक्रम कौतुकास्पद असल्याचे पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी म्हंटले आहे. डब्बू आसवानी राबवित असलेल्या हॅप्पीनेस स्ट्रीट उपक्रमास आयुक्त शेखर सिंह यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, आपल्या दैनिंदिन आयुष्यात खेळ हे महत्वाचे आहे. युवांसोबतच वयस्कर व्यक्तींनी देखील यामध्ये सहभाग घेणे आवश्यक आहे, अशाच प्रकारचे उपक्रम लोकप्रतिनिधींनी आपल्या पिंपरी चिंचवड शहरात राबविले पाहिजे, अशी प्रतिक्रिया शेखर सिंह यांनी दिली.
सदर उपक्रम २९ डिसेम्बर २०२४ ते २३ फेब्रुवारी २०२५ पर्यंत दर रविवारी पिंपरी येथील ओपन लॉन येथे राबविले जात आहे. फिट राहा, आनंदी राहा व संपर्कात राहा, असा संदेश देत हा उपक्रम साजरा होत आहे.
या उपक्रमाबाबत डब्बू आसवानी यांच्याशी पत्रकारांशी संवाद साधला असता, ते म्हणाले, लहान मुलांसह वयस्कर व्यक्तींनी आनंदी राहावे, विविध खेळाचा आनंद घ्यावा, याकरिता या हॅप्पीनेस स्ट्रीट उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमात लहान मुलांसाठी व युवक-युवतींसाठी तसेच वयोवृद्ध व्यक्तीसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले आहे.
मनुष्याचे जीवन निरोगी राहण्यासाठी, आयुष्यात खेळांचा समावेश असणे आवश्यक असते, लहान-मोठे वृद्ध सर्वांच्याच जीवनात विविध खेळाचे अनन्य साधारण महत्व असते, आणि यामुळेच पिंपरी चिंचवड शहरातील माजी उपमहापौर हिरानंद उर्फ डब्बू आसवानी यांनी पिंपरी मध्ये प्रथमच हॅप्पीनेस स्ट्रीट नावाचे उपक्रम राबवित आहेत. या उपक्रमाच्या अंतर्गत ४० विविध खेळ उपलब्ध करून देण्यात आले आहे.

आज या उपक्रमात सर्व वयोगटातील ५००० हजार नागरिकांचा मोठया संखेने सहभाग पाहावयास मिळत आहे. तसेच हि संख्या प्रत्येक आठवड्या मध्ये वाढतच झाली असून, नागरिक येथे खूप मोठ्या प्रमाणात त्स्फूर्तपणे सहभाग घेत आहे. म्युझिक, डान्स, विविध खेळांच्या स्पर्धा यामध्ये केरेम, बुद्धिबळ, रनिंग, सायकलिंग, जॅमर्स बोवलिंग, लाईव्ह शो, असे अनेकोनेक उपक्रम या हॅप्पीनेस स्ट्रीट अंतर्गत राबविले जात आहे.
तसेच या ४ थ्या आठवड्या मध्ये एक अजून विशेष ऍक्टिव्हिटीस केली गेली पिंपरी येथील ज्या कोणी विवाहीत जोडप्याला त्यांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाले आहे. अश्या जोडप्यांचे ऑनलाइन रजिस्ट्रेशन ठेवले होते व त्यांना स्टेज वर बोलवून एकमेकांच्या गळ्या मध्ये हार गालून त्यांच्या लग्नाच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांना टोकन ऑफ लव्ह हे प्रेम जिन्ह दिले. तसेच श्री.डब्बू आसवानी यांनी राबवलेल्या या उपक्रमा बाबत त्यांना धन्यवाद देण्यासाठी कु.दक्ष संजय मुलचंदानी याने एक रॅप गाणे बनवून ते धन्यवाद स्वरूपत सादर केले. ते देखील कौतुकास्पद होते.
सदर उपक्रमातील आजच्या लक्की ड्रॉ विजेत्यांचे बक्षीस वितरण पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्री.शेखर सिंह साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.



