पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड मधील घनदाट लोक वस्ती असलेल्या थेरगाव परिसरामधील विशेषतः पडवळ नगर, जय मल्हार नगर, अशोक सोसायटी, डोंगरे कॉर्नर, गणेश नगर, पंचशील कॉलनी मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेने थेरगाव परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता पिंपरी चिंचवड महापालिकेने विकास आराखड्याच्या नावावर दाटलोक वस्ती असलेल्या परिसरामध्ये चोवीस मीटर, बारा मीटर, पंधरा मीटर असे डीपी रोड प्रस्तावित केले आहेत तसेच तीस मीटर, तसेच HCMTR रस्त्याचे आरक्षण टाकले आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेने टाकलेल्या डीपी रोडमुळे थेरगाव परिसरातील हजारो नागरिकांची घर जमीनदोस्त करावी लागणार आहेत. नागरिकांनी आपल्या पोटाला चिमटा मारून कशीबशी आपल्या हक्काची घर मागील काही दशकापूर्वी बांधली आहेत. मात्र पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या विकास आराखड्यामुळे थेरगाव परिसरातील नागरिकांची घर जमीनदोस्त करावी लागणार आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिकेने थेरगाव परिसरात टाकलेली रस्त्याची आरक्षणे तातडीने रद्द करावी अशी मागणी मा. नगरसेवक सतिश दरेकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.























