पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड महापालिकेने नाशिक फाटा येथे भारतरत्न जे. आर. डी. टाटा उड्डाण पुल गेल्या ८ वर्षा पूर्वी बांधला. या उड्डाण पुलावर पिंपळे गुरव येथून नाशिक फाटा येथे उतरणारा लूप बांधण्यात आला आहे याला अंदाजे १० कोटी रुपये खर्च झाला होता. मात्र वाहतुक विभागाचा अभिप्राय न घेतल्याने महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेला हा लूप गेली ८ वर्षे वापराविना बंद आहे. त्यामुळे करदात्या नागरिकांचे पैसे पाण्यात गेले आहेत. या लूप मुळे मुंबई पुणे मार्गावर नाशिक – फाटा येथील चौकात वाहतूकीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे हा लूप पाडून सदर रस्ता सुरळीत करुन त्याचा खर्च संबंधित तत्कालीन कार्यकारी अभियंता आणि सल्लागार यांच्याकडून वसूल करण्यात यावा अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश नानासाहेब वाघेरे यांनी महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.




