पिंपरी प्रतिनिधी –
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरास सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या पवित्र कार्यात सहभागी व्हावे असे आवाहन मा. नगरसेविका तथा सभापती क क्षेत्रिय कार्यालय यांनी नागरिकांना केले आहे. त्या पुढे म्हणाल्या आपला एक छोटासा निर्णय अनेकांना जीवनदान देऊ शकतो त्यामुळे नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे. दि. २३ जुलै २०२६ (बुधवार)🕘 सकाळी ९.०० ते दुपारी ४.०० स्थळ मा. निखिल शिवाजी बोर्हाडे जनसंपर्क कार्यालय, वुड्सविले सेल्स ऑफिस समोर.
























