पुणे प्रतिनिधी:-
ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि शैक्षणिक साहित्याअभावी त्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, या उद्देशाने स्टारलाईट म्युझिकल इव्हेंट्स आणि अविरत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भोसलेवाडी तसेच रोकडोबानाथ विद्यालय, भांडगाव येथे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले.
या वेळी स्टारलाईट म्युझिकल इव्हेंट्स आणि अविरत फाउंडेशनचे आकाश जाधव, वंदना वशिष्ठ आणि रूपाली लाहोटी उपस्थित होते. भोसलेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक समद पठाण, दिपाली माळी, राजेंद्र जगताप, सचिन गुंड आणि अमोल भोसले उपस्थित होते.
तसेच रोकडोबानाथ विद्यालय, भांडगाव येथील मुख्याध्यापक सतीश कदम, नेवसे सर, मारुती पवार, दीपक थोरात, गाडेकर सर आणि रत्नपारखी मॅडम यांची उपस्थिती होती.
या उपक्रमासाठी अविरत फाउंडेशनच्या अध्यक्षा हेमाताई लाळगे तसेच सदस्य त्रिशाला वर्मा, अनोद गोस्वामी, दीपक फुलझेले, सचिन कुंभार आणि गणेश गोंजारे यांनी विशेष सहकार्य केले.
ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
“ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करणे म्हणजे त्यांच्या शिक्षणाच्या प्रवासाला बळ देणे होय. प्रत्येक मुलाला शिक्षणाची समान संधी मिळावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला असून, विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले आनंदाचे हास्य हीच आमच्या कार्याची खरी पावती आहे.” असे यावेळी बोलताना स्टारलाईट म्युझिकल इव्हेंट्स व अविरत फाउंडेशनचे आकाश जाधव म्हणाले.




























