पुणे प्रतिनिधी: –
रॉकवेल ऑटोमेशन इन्क; (एनवायएसई: ROK) या जगातील औद्योगिक ऑटोमेशन व डिजिटल परिवर्तनाशी समर्पित सर्वात मोठ्या कंपनीने पुण्यातील हिंजवडी येथे नवीन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटर (एसडीसी) चे नुकतेच उद्घाटन केले. हे केंद्र रॉकवेल ऑटोमेशनची जागतिक संशोधन व विकास क्षमता वाढवते आणि स्थानिक व जागतिक पातळीवरील ग्राहकांना त्यांच्या डिजिटल परिवर्तन प्रवासामध्ये मदत करण्यासाठी स्मार्ट सॉफ्टवेअर विकसित करेल.
रॉकवेल ऑटोमेशनचे जवळपास एक-तृतीयांश जागतिक सॉफ्टवेअर व कंट्रोल उत्पादन व्यवस्थापन कर्मचारीवर्ग भारतात आहेत. पुणे एसडीसीने उत्पादन व्यवस्थापन, सॉफ्टवेअर आर्किटेक्चर आणि अभियांत्रिकी यासारख्या पदांवर आधीच स्थानिक लोकांना रोजगार दिला आहे. आणि मागणी वाढल्याने आणखी लोकांना नोकरी देण्याची योजना आहे. तसेच एसडीसी कर्मचा-यांना आव्हानात्मक उत्पादन विकास क्षेत्रात काम करण्याची संधी देण्यासोबत जगभरातील औद्योगिक संघटना व ग्राहकांशी शेअर करण्याची व त्यांच्याकडून शिकण्याची संधी उपलब्ध करून देईल.
रॉकवेल ऑटोमेशनच्या सॉफ्टवेअर इंजीनिअरिंग, सॉफ्टवेअर व कंट्रोलचे संचालक मार्टिन डिटमर म्हणाले, ”आम्हाला भारतात सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट सेंटरचे उद्घाटन करण्याचा अभिमान वाटतो. हे स्थानिक व जागतिक बाजारपेठ गरजांची पूर्तता करणारी सॉफ्टवेअर उत्पादने निर्माण व विकसित करण्यासाठी जागतिक दर्जाचे केंद्र आहे. यामधून भारताची डिजिटलायझेशन मधील क्षमता दिसून येते आणि देशामध्ये गुंतवणूक करणा-या व ‘मेक इन इंडिया’ राष्ट्रीय उपक्रमामध्ये सहभाग घेणा-या जागतिक कंपनीचे रॉकवेल हे उत्तम उदाहरण आहे.”
रॉकवेल ऑटोमेशनचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप साहनी म्हणाले, ”भारत रॉकवेल ऑटोमेशनसाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि आमचा सॉफ्टवेअर विकास क्षेत्रामध्ये प्रगती करत राहण्याचा मनसुबा आहे. पुण्यातील नवीन एसडीसी आम्हाला आमची संशोधन व विकास क्षमता वाढवण्यामध्ये आणि जागतिक मानकांनुसार सॉफ्टवेअर उत्पादने विकसित करण्यामध्ये साह्य करेल. आमच्या स्थानिक टीम्स वाढवण्याकरिता भारतातील उच्च कुशल सॉफ्टवेअर टॅलेण्टचा लाभ घेत आमच्या क्षमता अधिक वाढवण्याची आमची योजना आहे. आमच्या नवीन एसडीसीमधील गुंतवणूकीमधून भारतातील विकासगाथा आणि त्यांचे डिजिटायझेशन व स्मार्ट उत्पादन धोरण उपक्रमांमधील आमचा विश्वास दिसून येतो.”
डिटमर यांच्यासह रॉकवेल ऑटोमेशनच्या जागतिक नेतृत्व टीममधील प्रमुख सदस्य एसडीसीच्या उद्घाटन समारोहाप्रसंगी उपस्थित होते जसे सॉफ्टवेर व कंट्रोलचे प्रमुख अभियांत्रिकी अधिकारी वेस मुकाई, मॅन्युफॅक्चुरिंग एक्झिक्युटिंग सिस्टिम्सचे व्यवसाय व्यवस्थापक मार्टिन पेट्रिक. स्थानिक भारतीय प्रतिनिधित्व करणारे रॉकवेल ऑटोमेशनचे व्यवस्थापकीय संचालक श्री. दिलीप साहनी उपस्थित होते.
रॉकवेल ऑटोमेशन अभियांत्रिकी, व्यावसायिक पुरवठा साखळी अशा क्षेत्रांमध्ये भारतातील त्यांचे स्थान वाढवण्यासोबत त्यांची सॉफ्टवेअर व तंत्रज्ञान क्षमता देखील वाढवत आहे. कंपनीने २०१५ पासून भारतातील त्यांच्या कर्मचा-यांची संख्या दुप्पटीहून अधिक केली आहे.
























