पुणे प्रतिनिधी:-
सुप्रसिध्द गायक सुदेश भोसले यांचा वाढदिवस ठरला एक संगीतमय पर्व.! अमित कुमार आणि जैष्ठ कलाकार सचिन पिळगावकर यांनी आती रहेंगी बहारें… बार बार दिन ये आये, तुम जिओ हजारों साल अशा एकाहून एक सरस सुमधूर गाण्यांनी रंगवला वाढदिवसाचा सोहळा तर दस्तूरखुद्द सुदेश भोसले यांनी ‘जुम्मा चुम्मा’ गाणे गाऊन कार्यक्रमात भरला अनोखा रंग

गायक सुदेश भोसले यांनी ग्रॅव्हिटी स्टुडिओ, मुंबई येथे कुटुंबीय आणि काही जवळच्या मित्रांसह वाढदिवस साजरा केला. सुदेश भोसले यांची पत्नी हेमा, मुलगी श्रुती आणि मुलगा सिद्धांत भोसले यांनी सोहळ्याचे यजमान पद उत्तमरित्या सांभाळले. सुदेश भोसले यांना शुभेच्छा देण्यासाठी प्रख्यात कॉमेडियन अभिनेता जॉनी लीव्हर हे सर्वप्रथम पोहोचले.
सचिन पिळगावकर, सुभाष देसाई, अमित कुमार, राजू सिंग, कुलदीप सिंग, आरएसएस मणी, अली खान, व्हीआयपी, वैशाली सामंत, सिद्धार्थ पटनायक असे अनेक जवळचे मित्र त्यांच्या कुटुंबीयांसह या सोहळ्याला उपस्थित राहिले आणि त्यांनी कार्यक्रमाची शोभा वाढवली. मेलडी मेकर्सचे अशोक कुमार सराफ आणि प्रवीण कुमार सराफ यांनीही या संगीत संध्येचा आनंद लुटला. सुदेश भोसलेंचा वाढदिवस असल्याने उपस्थित असलेल्या जवळ जवळ त्यांच्या प्रत्येक मित्राने माईक हाती घेऊन त्यांच्या आवडीचे गाणे गायले. अशा या मधुर सुरावटींनी ग्रॅव्हिटी स्टुडिओ भरून गेला. वाढदिवस सोहोळ्याला उपस्थित पाहुण्यांनी एका अविस्मरणीय संध्याकाळचा अनुभव घेतला. ही संध्याकाळ सगळ्यांच्या अनेक वर्ष लक्षात राहील यात शंका नाही.




