पुणे प्रतिनिधी:-
जर आपण बेंगलोर – पुणे, कोल्हापूर ते पुणे सातारा ते पुणे असा प्रवास करत असाल तर ही बातमी एकदा वाचाच सध्या पावसाळा सुरु झाला आहे अनेक नागरिक सुट्टीच्या दिवशी आणि शनिवारी रविवारी पर्यटनास फिरताना दिसत आहेत परंतु दुर्दैवाने शासन हजारो नागरिकांच्या जिवीताशी खेळत आहे असे म्हणण्याचे कारण ही तितकेच गंभीर आहे.
जर आपण बेंगलोर – पुणे, कोल्हापूर ते पुणे सातारा ते पुणे असा प्रवास करत असाल तर पुण्याकडे येताना जर नवीन हायवेवरुन म्हणजे जुन्या कात्रज घाटाच्या शेजारील नवीन दोन बोगदे आणि जांभूळ वाडी येथील दरी पूलावरुन प्रवास करत असाल तर मात्र सावधान…! कारण बोगदे ओलांडून पुढे पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या कृपेने काळ दबा धरुन बसलेला असेल कारण ही तितकेच गंभीर आहे पहा वास्तव 👇👇👇
मित्रांनो वरील व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात आले असेल की ही किती गंभीर बाब आहे पुलाचे स्लॅब जिथे जोडले गेले आहे ते जॉईंटच उखडू लागले आहेत गेले कित्येक दिवसांपासून हीच परिस्थिती आहे. कित्येक वर्षांपासून नागरिकांकडून टोलच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये ठेकेदार आणि प्रशासनाने मिळवले आहेत आणि पुढे ही सुरुच आहे त्यात गेली नऊ वर्षे पुणे बेंगलोर हायवे चे रुंदीकरण ठेकेदार आणि शासनाच्या वादात अडकले होते आता कुठे करोना काळानंतर परिस्थिती हळूहळू पुर्वपदावर येत आहे.
नागरिक पावसाळ्याच्या निमित्ताने पर्यटनासाठी बाहेर पडत आहेत लॉकडाऊन काळात काही कामे रखडली होती परंतु ती परिस्थिती निवळून आता जवळपास वर्ष झाले तरीही रस्त्यांची कामे ही निकृष्ट दर्जाचीच होतायत जांभूळवाडी येथील दरी पूल वाहतुकीसाठी खुला होऊन जवळपास दहा वर्षे झाली येथील तीव्र उतार आणि वळणावर अनेक अपघातही झाले आहेत परंतु प्रथमदर्शनी पाहता या सगळ्या अपघातास कुठेतरी कुंभकर्णी झोपेतील शासनच जबाबदार आहे असे दिसून येते. पुलावरून पाणी वाहून जाण्यासाठी केलेले उपाय फक्त कागदोपत्रीच आहेत प्रत्यक्षात मात्र पाऊस आल्यानंतर डोंगर उतारावरून वाहत येणारे पाणी पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहते आहे त्यामुळे पुलाच्या स्लॅब ला धोका निर्माण होऊ शकतो.
निकृष्ट दर्जाची, नियोजन शून्य कामे तर अपघातांस जबाबदार आहेतच पण त्याचबरोबर नागरिकांची बेपर्वाई ही तितकीच जबाबदार आहे.




