पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड शहरातील फ्लॅट व सोसायटीधारकांच्या अनेक समस्या आहेत. बिल्डरकडून फसवणूक, महापालिकेच्या संदर्भातील अडचणी, सहकार विभागातील समस्या, विजेची समस्या अशा अनेक अडचणींच्या विळख्यात सोसायटीधारक आहेत. आता या सर्व समस्यांचा निपटारा होणार आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत ‘संवाद सोसायटी धारकांशी’ या उपक्रमाचे आयोजन बुधवार दि.०५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ८ वाजता थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे.
‘संवाद सोसायटी धारकांशी’ या उपक्रमाबातची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहाराध्यक्ष अजित गव्हाणे आणि माजी नगरसेविका माया बारणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इरफान शेख, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, मयुर कलाटे, पंकज भालेकर, नाना काटे, अजित प्रतिष्ठानचे विश्वस्त अभय मांढरे, फजल शेख, वर्षा जगताप, इखलास सय्यद आदी उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत माहिती देताना अजित गव्हाणे म्हणाले की, राज्याचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपल्या शहरातल्या सोसायटी धारकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी येत आहेत. बुधवार दि.५ ऑक्टोबर २०२२ रोजी थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालय, या ठिकाणी सकाळी ८ वाजता ‘संवाद सोसायटी धारकांशी’ या उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून लोकांना आवाहन करतो की, ३ ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे त्या त्या भागातील सोसायटींच्या लोकांनी त्यांचे काही निवेदन असेल, त्यांच्या तक्रारी असतील, तर त्या आमच्याकडे द्याव्यात. दि.०५ ऑक्टोबर रोजी त्या सर्व तक्रारी, निवेदन अजितदादांपुढे सादर करणार आहोत. तसेच त्याठिकाणी ऐनवेळी कोणी त्यांचे तक्रार घेऊन आले तर ती आपण घेणार आहोत. या तक्रारीत प्रामुख्याने महापालिकेशी संबंधित, बिल्डर्स, सरकार क्षेत्र आणि विज वितरण संबंधित आहेत. त्या तक्रारी सोडवण्याच्या अनुषंगाने अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली सोडविणार आहोत. तसेच समस्या ऐकून घेऊन पुढच्या काळामध्ये त्या टप्प्याटप्प्याने आपण सोडण्याचा प्रयत्न करणार आहोत.
माया बारणे म्हणाल्या की, ‘संवाद सोसायटी धारकांशी’ हा उपक्रम आम्ही प्रायोगिक तत्त्वावर राबवत आहोत. वर्षानुवर्षे सोसायटी धारकांचे प्रश्न प्रलंबित होते. निश्चितच या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही हे सर्व प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्यामुळे हे सर्व प्रश्न, समस्या मार्गी लागतील. तसेच या तक्रारींची दखल देखील प्रशासकीय पातळीवर घेतली जाईल असा विश्वास माया बारणे यांनी व्यक्त केला.
नागरिकांनी अशी करा तक्रार.. 👇👇👇
सर्व नागरिकांनी आपल्या फ्लॅट विषयी काहीही तक्रार असेल तर खालील मेल वर पाठवावी ही विनंती
चिंचवड विधानसभा Mail ID
[email protected]
[email protected]
भोसरी विधानसभा Mail ID
[email protected]
[email protected]
[email protected]
पिंपरी विधानसभा Mail ID
[email protected]




