पिंपरी प्रतिनिधी:-
नुकतीच पिंपरी चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली आहे. कै. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली आणि भाजपच्या चतुरस्त्र यंत्रणेने दहाच दिवसात निवडणुकीची घोषणा केली. याचा अर्थ दिवंगत जगताप यांच्या मृत्यूची चाहूल लागताच भाजपच्या चतुरस्त्र चाणक्यांनी सुत्रे हाती घेतली कारणही तसेच होते त्यांची प्रकृती चिंताजनक होती. हे सगळे अवघ्या दहाच दिवसात घडले ते गेले दशक्रिया विधी झाला आणि सत्तेची महत्वाकांक्षा असलेल्या भाजपने त्यांच्या जाण्याची सहानुभूती मिळवण्यासाठी ही खेळी केली.
वास्तविक राज्यातील सरकार ही अस्थीरच आहे ही जागा रिक्त ठेवली आणि बहुमताची वेळ आली तर पाठींबा कोण देणार अशा वेळी एक एक आमदार महत्त्वाचे असतात म्हणून हा खटाटोप चिंचवड सोबतच पुण्यातील कसबा विधानसभेची ही जागा महत्वाकांक्षी भाजपला गमवायची नाही. महाराष्ट्रातील या दोन जागा महाराष्ट्राच्या सत्तेत गेमचेंजर ठरल्या तर मागील दोन वर्षाच्या राजकीय घटना बघता भाजपने जिथे जिथे विद्यमान आमदार गेले तिथे तिथे त्या जागा सत्तेच्या महत्वाकांक्षेनेच लढवल्या हे काही जनतेला माहिती नाही असे नाही. तेच आता कसबा आणि चिंचवडच्या बाबतीत सुरू आहे.
दिवंगत जगताप यांच्या निधनानंतर दहाच दिवसात हळूहळू कुजबूज सुरू झाली की परिवारातील सदस्यांमध्ये वाद झाले मग काहींनी तशा प्रकारच्या बातम्या पेरल्या अजूनही सुरूच आहे. बेबनाव आहे असं चित्र निर्माण झालं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण एकीकडे उतावीळ लोक बातम्या पेरण्यात दंग असताना दुसरीकडे मात्र जगताप परिवारातील सदस्य सोशल मीडियावर परिवार कसा एकजुटीने उभा आहे हे दाखवणाऱ्या पोस्ट टाकून परिवार वाचवण्यासाठी धडपडत आहे. असे दिसते खरी परिस्थिती चार भिंतीत राहणाऱ्या जगताप परिवारातील सदस्यांनाच ठावूक.
दहाच दिवसात स्वतःचे आणि परिवाराचे हसू करून घेण्याइतके जगताप परिवारातील सदस्य दुधखूळे तर नक्कीच नाहीत.
भावनात्मक राजकारण कसं करावं हे फक्त आणि भाजपच्या चतुरस्त्र नेत्यांकडून शिकण्यासारखं आहे. आणि त्यात ते यशस्वी होताना दिसतायत परिवारातील दोन सदस्यांनी वेगळे वेगळे फॉर्म आणण्यापासून ते आज सोशल मीडियावर परिवारातील सदस्यांनी टाकलेल्या पोस्ट आणि भाजपच्या विद्यमान शहराध्यक्ष आमदारांनी काही माध्यमांना दिलेल्या मुलाखती हे सगळंच प्रीप्लांट आहे असं वाटतंय
उमेदवार जगताप परिवारातील कोणताही सदस्य असो जिंकणार तर भाजपच जे भासवले जाते आहे ते फक्त विरोधकांना गाफील ठेवण्यासाठीच. आणि सहानुभूतीच्या लाटेचा पुरेपूर फायदा घेण्यासाठीच भाजपच्या या जाळ्यात विरोधक गुंतले गेले हे मात्र नक्की.




