पिंपरी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड येथील चिंचवड विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांनी अर्ज ही भरले आहेत. परंतु चिंचवड मतदार संघात चर्चा फक्त आणि फक्त आहे ती महा विकास आघाडीच्या नाना काटे यांची युवा नेतृत्व असूनही लहानांपासून थोरामोठ्यांच्या मुखी फक्त एकच नाव आहे ते म्हणजे नाना काटे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पोटनिवडणूकीसाठी नाना काटे यांना अधिकृत उमेदवारी दिली असून नानांना आमदार करण्यासाठी पक्षातील कार्यकर्ते हिरीरीने सहभागी होत असून पिंपळे सौदागर, रहाटणी, काळेवाडी या पूर्वाश्रमीच्या गावात तर एकमताने ठराव मंजूर झाले आहेत. आमदार म्हणून नाना काटे यांनाच निवडून देण्याचा निर्धार येथील ग्रामस्थांनी, जैष्ठांनी नव्हे तर युवा पिढीनेही केला आहे.
त्यामुळेच यंदा परिवर्तन होणार राष्ट्रवादी काँग्रेसचाच आमदार होणार असा एकमुखी सूर चिंचवड मतदारसंघातील जनतेतून येऊ लागला आहे.