गुरुवारी सकाळपासूनच महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांच्या पदयात्रेस सुरुवात झाली. ठिकठिकाणी ढोल ताशांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले. सकाळी प्रभाग क्रमांक ३१ व ३२ मधील काळेवाडी, ज्योतिबा नगर, तापकीर चौक, तापकीर नगर, तापकीर माळ चौक, भारतमाता चौक, विष्णुराज चौक या भागात नानांनी ज्येष्ठ नागरिक व माता-भगिनींच्या भेटी घेतल्या. ठिकठिकाणी महिलावर्गाने त्यांचे औक्षण केले. ज्येष्ठ नागरिकांनी हात उंचावून त्यांना विजयासाठी आशीर्वाद दिला. तरुण मुले व मुली उत्स्फूर्तपणे त्यांच्या पदयात्रेत सहभागी झाली.
सायंकाळच्या सत्रात काळेवाडी, विजयनगर प्र. क्र. ३१ परिसरातील गणपती मंदिरापासून नाना काटेंच्या पदयात्रेस प्रारंभ झाला. त्यानंतर आदर्श नगर – भोईर मार्ग – नवरत्न चौक – अल्फोन्सो स्कूल रोड – कारवार चौक – प्रकाश नढे यांचे घर – साई एन्क्लेव्ह रोड – सत्संग रोड – ज्योतिबा मंगल कार्यालय – निर्मल स्कूल रोड – गणेश कॉलनी – निर्मल स्कूल रोड – ज्योतिबा मंदिर समोर – नंदादीप कॉलनी – संघर्ष कॉलनी – जय मल्हार चौक – क्रांतीवीर कॉलनी – शिवकृपा कॉलनी – सुयोग कॉलनी – साई कॉलनी – प्रेम लोक कॉलनी – शिवशक्ती कॉलनी – पवना चौक – श्रीकृष्ण कॉलनी – १,२,३ – पंचनाथ चौक – दीपक अंकुश घरासमोरून- भारत माता चौक-माने शाळा मार्गे ही पदयात्रा गेली. यावेळी मतदारांनी काटे यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यानंतर राजवाडा लॉन्स येथे कोपरा सभा घेण्यात आली.
या पदयात्रेत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी प्रांतिक सदस्य दिलीप काळे, माजी नगरसेविका उषा काळे, माजी नगरसेवक विनोद नढे, संतोष कोकणे, शाम लांडे, राहूल भोसले, शिवसेना नेते हरीष नखाते, राष्ट्रवादीचे नेते विजयराव सुतार, काँग्रेस शहराध्यक्षा सायली किरण नढे , मा.ड. प्रभाग स्वीकृत सदस्य नवनाथ नढे, युवा कार्यकर्ते चंद्रकांत तापकीर, विवेक तापकीर, राष्ट्रवादी ब्लॉक अध्यक्ष संतोष काटे, सचिन काळे, रवी नागरे, सुभाष लोंढे, बजरंग नढे, सनी नढे, नीलेश मराठे, संगीताताई कोकणे, इलियास सय्यद, अश्विनी तापकीर, सुजाता नखाते, मोनिका नढे, हेमंत काटे, चेतन काटे, योगेश काटे, अंकित काटे, धनंजय मेटे, बापू जंजाळे, हितेश ढगे, दीपक अंकुश, मनोज म्हस्के आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बाजीप्रभू चौक येथे या पदयात्रेचा शेवट करण्यात आला.
प्रचारात महाविकास आघाडीची एकजूट !




