तळवडे प्रतिनिधी:-
गवाही देगी युगों युगों तक सृष्टि भव्य मंदिर की ऐसी दास्तान लिख देंगे कोई पूछेगा जो पहचान हमारी अपनी पहचान हम श्री राम की संतान लिख देंगे अशा अनेक घोषणांनी तळवडे परिसर दुमदुमून गेला.

२२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत भगवान श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर सर्वांसाठी खुले होणार आहे. त्यानिमित्त अयोध्येतून आलेल्या अक्षदा कलशाचे पूजन व स्वागत मा.नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर व तळवडे ग्रामस्थ यांच्यासह करण्यात आले व तळवडे गावातील श्री. भैरवनाथ मंदिर व श्री. हनुमान मंदिर श्री.ज्योतिबा मंदिरामध्ये पूजन साठी अक्षदा या कलशाचे पूजन व स्वागत करण्याचे भाग्य माता भगिनींना व तळवडे ग्रामस्थांना मिळाले..!




