तळवडे प्रतिनिधी:-
विकसित भारत संकल्प यात्रे अंतर्गत दिनांक २० रोजी प्रबोधनकार ठाकरे शाळा आणि दिनांक २१ रोजी तळवडेगाव येथील कै. किसनराव अंतुजी भालेकर प्राथमिक शाळा क्रमांक ९८ मध्ये शासनाच्या विविध योजनांची नागरिकांना माहिती देण्यात आली व योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्याबाबत मा.नगरसेवक शांताराम बाप्पू भालेकर यांनी मार्गदर्शन केले. यामध्ये पी.एम. स्वनिधी योजना, प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री उज्वला गॅस योजना, आधारकार्ड अपडेट करणे ,आरोग्य तपासणी व इतर योजनचे शाळेमध्ये माहिती देणारे स्टॉल लावले होते. सकाळी ९ ते सांय. ५.३० वाजेपर्यंत बहुसंख्य नागरिक या योजनांचा फायदा घेत आहे. तसेच सकाळी १०.३० वाजता विकसित भारत संकल्प रथाचे उदघाटन मा. नगरसेवक शांताराम (बाप्पू) भालेकर, मा.नगरसेवक प्रवीण भालेकर, रमेश भालेकर, फ प्रभागाचे क्षेत्रीय अधिकारी सिताराम भवरे साहेब, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने साहेब, सामाजिक कार्यकर्त्या सौ.वैशालीताई भालेकर, मुख्य आरोग्य निरीक्षक इंदलकर साहेब, किसन मिसाळ, आरोग्य निरीक्षक महेंद्र साबळे साहेब, अंजली गायकवाड, कोमल मोरे, शिंदे काका, भोसले काका व जनवाणीचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. विकसित भारत संकल्प योजनाची शपथ घेण्यात आली.

माजी नगरसेवक शांताराम बापू भालेकर यांनी विकसित संकल्प यात्रे अंतर्गत शासनाच्या विविध योजनाची माहिती नागरिकांना देऊन या सर्व योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले.
या संकल्प रथाद्वारे भारत सरकारच्या विविध विकासकामाचे व राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली. या कार्यक्रमानिमित्त जनवाणी स्टाफ, जेष्ठ नागरिक, महिला व महानगरपालिकेचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.




