पिंपरी प्रतिनिधी:-
देशामध्ये लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्या संदर्भात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचा उमेदवाराला उमेदवारी मिळावी या संदर्भात सदर पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.
मा.अजितदादा यांनी आजपर्यंत पिंपरी चिंचवड शहरात केलेली विकास कामे, आणि त्यांची निर्णयक्षमता, विश्वासार्हता; यामुळेच शहराचा एवढा विकास झाला आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघा मध्ये आण्णा बनसोडे हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचेच आमदार आहेत, अशातच झालेल्या चिंचवड येथील पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उमेदवार मा.नाना काटे यांना सुमारे १ लाख मते मिळालेली आहेत. एवढी संवेदनशील निवडणूक असून देखील काटे यांनी सुमारे १ लाख मतांपर्यंत मजल मारली आहे.
तरी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने गेली ३० वर्षे राजकारणात सक्रीय असणारे मा.भाऊसाहेब भोईर यांच्यासाठी मागणी करीत आहोत. कार्यकर्ता म्हणून त्यांची संपूर्ण कारकीर्द सर्वश्रुत आहे. विद्यार्थी दशेपासून ते समाजकारण व राजकारणात सक्रीय आहेत. सन १९९२ साली महानगरपालिकेवर नगरसेवक पदी पहिल्यांदा निवडून आले. तेव्हापासून सलग ५ वेळा नगरसेवक म्हणून निवडून येत आहेत; त्याचबरोबर पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण येथील कामाचाही त्यांचा अनुभव असून सांस्कृतिक क्षेत्रामध्येही त्याचे योगदान मोठे आहे.
नुकतेच त्यांनी १०० व्या ऐतिहासिक नाट्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करून शहराच्या सांस्कृतिक वैभवात भर घातली. त्यामुळे शहरातील विकासकामे, पक्षाची ताकद, व मा. भाऊसाहेब भोईर यांची दीर्घ कारकीर्द पाहता मावळ लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांच्यासाठी निश्चितपणे योग्य राहील. भाऊसाहेब भोईर यांचा मावळ भागात चांगला जनसंपर्क व नातीगोती असून उरण,कर्जत व पनवेल मतदार संघांमध्ये देखील त्यांचा पूर्वीपासून संपर्क आहे. तरी आपण मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी साठी सोडावा व मा. भाऊसाहेब भोईर यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने पक्षश्रेष्ठींकडे केली आहे.
सदर पत्रकार परिषदेस शहराध्यक्ष अजित गव्हाणे महिला अध्यक्ष कविता आल्हाट, ज्येष्ठ नेते भाऊसाहेब भोईर, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, युवक अध्यक्ष शेखर काटे, युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर,पुणे इन्स्टिट्यूट डायरेक्टर चेतन गवळी, माजी नगरसेवक भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, युवक कार्याध्यक्ष तुषार ताम्हाणे, प्रसाद कोलते, पिंपरी विधानसभा युवक अध्यक्ष अक्षय माछरे,भोसरी विधानसभा युवक अध्यक्ष सागर बोराटे, प्रशांत सपकाळ, चिंचवड विधानसभा अध्यक्ष प्रतीक साळुंखे, गणेश गायकवाड, संकेत जगताप, भागवत जवळकर, ओंकार विनोदे, आधी पदाधिकारी उपस्थित होते.























