चिंचवड प्रतिनिधी:-
विधानसभा निवडणूक जवळ येत आहे तशी इच्छुकांमध्ये धाकधूक वाढली आहे, चिंचवड मधून इच्छुकांमध्ये रस्सीखेच सुरू असून त्यात आता अजित पवार गटाचे नाना काटे आणि तीन वेळा चिंचवड विधानसभा लढवलेले राहुल कलाटे हे प्रमुख दावेदार आहेत मात्र आता तुतारी कडून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक मयुर कलाटे यांचे नावे पुढे येत आहे, मयुर कलाटे यांनी या अगोदर राष्ट्रवादी पक्षाचे युवक अध्यक्ष म्हणून काम केले आहे तसेच ते माजी नगरसेवक ही आहेत पक्ष संघटना हाताळण्याचा अनुभव गाठीशी असल्याने आणि तरुण तडफदार युवा नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, तर नाना काटे यांनी या अगोदर दोन वेळा चिंचवड ची निवडणूक लढवली असून मागील वेळेस त्यांनी तब्बल नव्व्यांनव हजार मतदान घेतले त्या वेळी अपक्ष उभे असलेले राहुल कलाटे यांनी २०१९ ला एक लाख बारा हजार मते घेतली तर पोटनिवडणुकीत वैयक्तिक चौवेचाळीस हजार मते घेतली आहेत, त्या पोटनिवडणुकीत राहुल कलाटे यांच्यामुळे नाना काटे यांचा पराभव झाला. अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. आता मात्र काही झाले तरी लढायचे अशी भूमिका नाना काटे यांची असून राष्ट्रवादी अजित पवार गट महायुतीचा भाग असल्याने चिंचवड ची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला सुटण्याची शक्यता कमी आहे.त्यामुळे निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले नाना काटे किंवा मयुर कलाटे ऐनवेळी तुतारी चिन्हाकडून लढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा पिंपरी चिंचवड मधील मोठा मतदार संघ असून गेली पंधरा वर्षे चिंचवड वर जगताप परिवाराचे निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. २०२३ साली दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. आणि मतदार संघात पोटनिवडणूक जाहीर झाली पोटनिवडणुकीत ही पुन्हा चिंचवड मतदारसंघातील जनतेने जगताप परिवाराच्या पाठीशी उभे राहून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना बहुमताने निवडून दिले. त्यावेळी महायुतीचा भाग नसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून नाना काटे उमेदवार होते. त्यांनी नव्व्यांनव हजार मतदान घेतले आणि अपक्ष उमेदवार म्हणून राहुल कलाटे यांनी अर्ज भरून तब्बल चौवेचाळीस हजार मतदान घेतल्याने नाना काटे यांचा पराभव झाला अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली राहुल कलाटे अपक्ष म्हणून उभे राहिले नसते तर नाना काटे विजयी होऊ शकले असते.
परंतु २०२३ नंतर चिंचवड मतदार संघातील चित्र बदलले असून चिंचवडच्या जनतेला नवीन तरुण तडफदार चेहरा हवा असल्याची चर्चा असल्यानेच मयुर कलाटे विधानसभेच्या मैदानात तुतारी चिन्हाकडून लढण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे, २०१९ ला मावळ लोकसभा लढवण्यासाठी मयुर कलाटे इच्छुक होते, त्यांनी त्यावेळी मावळ मध्ये कुस्ती स्पर्धचे आयोजन केले होते, मात्र ऐनवेळी अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार हे मावळ लोकसभेसाठी इच्छुक झाले, आणि मयुर कलाटे यांनी आपली तलवार म्यान केली, मात्र आता मयुर कलाटे हे चिंचवड विधानसभा लढविण्यासाठी इच्छूक झाले आहेत, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष तुषार कामठे हे ही त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकतात, कारण तुषार कामठे यांना नाना काटे, राहुल कलाटे यांच्यापेक्षा मयुर कलाटे हे जवळचे आहेत. त्यामुळे ऐनवेळी मयुर कलाटे यांचे नाव पुढे येण्याची दाट शक्यता आहे.




