मुंबई प्रतिनिधी:-
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीतील एका व्यक्तीने मराठा कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीवर नाराजी व्यक्त केली.
अशी वैयक्तिक टीका ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं म्हणत अजित पवार यांनी सोशल मीडियावरील सोशल मिडियावर पोस्ट केली आहे. मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. मराठा समाजासाठी आरक्षण विषयक मागण्या विविध स्तरावर ते लावून धरत आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी एक चळवळ उभी केलेली आहे. आज बारामतीतील एका व्यक्तीने श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात काही अपशब्द वापरलेले आहेत. त्यांच्या वक्तव्यांशी आम्ही सहमत नाही. असे अजित पवार यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे.































