पिंपरी प्रतिनिधी:-
आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळ संचलित श्री सरस्वती प्राथमिक,माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा बक्षीस वितरण सोहळा उत्साही व आनंदी वातावरणात पार पडला.
या स्नेहसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक माननीय प्राध्यापक गोविंदरावजी दाभाडे सर हे उपस्थित होते. यावेळी नवनगर शिक्षण मंडळाचे संचालक ऍडव्होकेट श्री सूरज शेलार, अभिषेक गोविंद दाभाडे, मा.विरोधी पक्षनेते पिंपरी चिंचवड महानगरपालिका नाना काटे , अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद,पिंपरी चिंचवड अध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक मा.भाऊसाहेब भोईर , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर उपाध्यक्ष जितेंद्र पाटील ,सुनील पाटील अध्यक्ष साईराज युवा प्रतिष्ठान चिंचवड, सरस्वती प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक राजू माळे ,प्रभारी मुख्याध्यापक अमोल गुंड ,सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर उरुळी कांचनचे मुख्याध्यापक कुंजीर सर,
सरस्वती माध्यमिक विद्यालयाच्या प्राचार्य संगीता गुरव सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर सर्व शिक्षक वृंद व पालक वर्ग उपस्थित होते.
यावेळी ५०० विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांनी एक तरी मोदक हवा, दख्खनची राणी ,इतनी सी खुशी, गणपती नृत्य, तू चाल पुढे, कृष्णजन्म, जय हो ,आई मला खेळायला जाऊ दे ,शेतकरी नृत्य, गजर विठ्ठलाचा, पावनखिंड ,अप्सरा आली ,मी मराठी ,खंडोबा नृत्य, डम डम डमरू, गोंधळ आणि राष्ट्रीय एकात्मतेवर आधारित समूह नृत्य यांचे सादरीकरण केले.
” विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या सूप्त गुणांचा विकास होऊन त्यांचा संपूर्ण विकास व्हावा यासाठी अशा स्नेहसंमेलनाची आवश्यकता असते. त्यासोबतच मनोरंजन व्हावे, आनंद मिळावा हा हेतू नजरेसमोर ठेवून आज स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आलेले आहे,” असे मत नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक माननीय प्राध्यापक गोविंदरावजी दाभाडे सर यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. कल्पना उभे ,निवेदन सौ. नंदा पाटील व सौ जयश्री खामगळ तर सौ सविता पाटील यांनी आभार मानले.




