चिंचवड प्रतिनिधी:-
नोकरीच्या शोधात असलेल्या युवक-युवतींसाठी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. इच्छुक उमेदवारांनी त्वरित नोंदणी करून रोजगाराची संधी मिळवण्यासाठी महाकुंभात सहभागी व्हावे,” असे आवाहन चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार शंकर जगताप यांनी केले आहे.
वैश्विक नेतृत्व, देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त हा रोजगार मेळावा मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी दि न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल, नवी सांगवी येथे होणार आहे.या रोजगार महाकुंभात विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधींची माहिती, कंपन्यांशी थेट संवाद आणि रोजगार मार्गदर्शन उपलब्ध होणार असल्याचे आमदार जगताप यांनी नमूद केले.
करिअरची पुढील दिशा ठरवण्यासाठी आवश्यक माहितीही युवक-युवतींना एकाच ठिकाणी मिळणार आहे. इच्छुक तरुण तरुणींनी अधिक माहितीसाठी ९९२१०९९२१४, ७३५००७९९५५ किंवा ७५७५९ ८११११ या क्रमांकावर तसेच
https://docs.google.com/forms/d/1Ac8em2RstBW6zH6n9vO2k6trJKHABEGRqRm7KCFiogg/viewform?edit_requested=true
या लिंकवर नावनोंदणी करावी आणि कार्यक्रमाला येताना आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील आपल्या तरुण-तरुणींना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगाराच्या सर्वोत्तम संधी एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, हा या ‘रोजगार महाकुंभा’चा मुख्य उद्देश आहे. नामांकित कंपन्यांशी थेट संवाद साधून स्वतःच्या करिअरला नवी दिशा देण्याचे हे एक प्रभावी व्यासपीठ ठरेल. परिसरातील सर्व पात्र आणि इच्छुक युवक-युवतींनी या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.” असे आवाहन आमदार शंकर जगताप यांनी युवक-युवतींना केले.































