चिंचवड प्रतिनिधी:-
प्रभाग क्र. १८ मधील जेष्ठ नागरिक व महिलांसाठी एस टी स्मार्ट कार्ड नोंदणी मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेत नोंदणी झालेल्या १००० हून अधिक लाभार्थ्यांना आज एसटी स्मार्ट कार्डचे वितरण करण्यात आले. या वेळी प्रभागातील नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर, अपर्णा डोके, मनिषा चिंचवडे, भाजपा उपाध्यक्ष रविंद्र देशपांडे यांच्या हस्ते हे वितरण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने जेष्ठ नागरिक व महिला उपस्थित होते.
शासनाच्या योजनेअंतर्गत जेष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी प्रवासात सवलत मिळावी, यासाठी हे स्मार्ट कार्ड महत्त्वाचे आहे. प्रभागातील नागरिकांना याचा मोठा लाभ होणार असून, भविष्यातही अशा लोकाभिमुख योजना राबविण्यात येतील. असे यावेळी नगरसेवक सुरेश भोईर यांनी सांगितले.






























