पुणे प्रतिनिधी:-
दक्षिण भारतातील एक लाखापेक्षा अधिक शेतकऱ्यांसह काम करत असतांना आर्टिफ़िशीयल इंटेलिजन्सवर आधारलेली, शेती व्यवस्थापन आणि काळानुरूप मार्गदर्शन करणाऱ्या, वेकुल फ़ूड्सच्या आऊटग्रो किसान प्रगती पुरस्कार 2022 चे पुरस्कार वितरण नुकतेच करण्यात आले. शेती आणि बागायती शेतीमधील सर्वोत्तम अशा पद्धती ओळखण्याचे ध्येय साध्य करत यंदा महाराष्ट्रातील नऊ शेतकऱ्यांना तीन श्रेणींमधून गौरविण्यात आले, ज्या होत्या शेती कल्पकता, नैसर्गिक शेती आणि महिला शेती – उद्योजिका.
यावेळी बोलताना आऊटग्रो आणि शेती प्रतिबद्धता प्रमुख श्री. सेन्धिल कुमार म्हणाले, “ गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बरेच कल्पक बदल घडून आलेले असून त्याचा एकूणच पर्यावरण प्रणालीला फायदा झालेला आहे. या बदलास स्वीकारण्यामध्ये वेकुल नेहमीच अग्रस्थानी राहिलेली असून आऊटग्रो आमचे असे एक व्यासपीठ आहे ज्याद्वारे शेतकऱ्यांसह थेट काम केले जाते, खांद्याला खांदा लावून लाभदायी आणि टिकाऊ अशा भविष्याकडे वाटचाल करण्याचा एक प्रयत्न केला जातो. आम्ही मोठ्या प्रमाणावर जरी शेतकऱ्यांसह काम करत असलो तरी काही तळागाळातील आणि लपून राहिलेल्या कल्पकता आहेत ज्यांना प्रकाश झोतात आणून योग्य ती ओळख मिळवून देणे फ़ार आवश्यक आहे. किसान प्रगती पुरस्कार याच हेतूने दिले जातात, यामुळे उत्तम अशा पद्धती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत आणल्या तर जातातच पण एक शैक्षणिक व्यासपीठाची निर्मिती देखील केली जाते ज्यामुळे शेतकऱ्यांना अशा कल्पकता आजमावता येतील आणि नैसर्गिक आणि पुनरुत्पादक शेतीचा अवलंब करता येईल. सगळ्या विजेत्यांचे मी मनापासून अभिनंदन यावेळी सेन्थिल यांनी केले. आणि त्यांच्या कल्पकता पुढे नेत भारतातील अधिकाधिक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळवून देण्याचे काम आम्ही करत राहू.” असे म्हणाले.
नामांकन प्रक्रियेमध्ये सुमारे पाचशे अर्ज आले होते ज्यांच्यातून तज्ञ मंडळींद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली. या तज्ञ मंडळींमध्ये प्रा. डॉ. महावीर चव्हाण , विद्यार्थी कल्याण अधिकारी महात्मा फ़ुले कृषी विद्यापीठ राहुरी आणि संचलाक राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) यांचा समावेश होता, तसेच कार्यक्रमाला इन्स्टिट्युट ऑफ़ इंडियन काऊन्सिल ऑफ़ ॲग्रीकल्चर रिसर्चमधील एका महत्वाच्या असलेल्या द्राक्षाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राचे संचालक डॉ. आर.जी सोमकुवर, रेसिड्यु फ़्री ॲन्ड ऑर्गॅनिक मिशन इंडिया फ़ेडरेशनचे (ROMIF INDIA) राष्ट्रीय अध्यक्ष, डॉ. प्रशांत नायकवाडी, आणि कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव, पुणे येथील वरीष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉ. प्रशांत शेटे उपस्थित होते.
किसान प्रगती पुरस्कार 2022 चे महाराष्ट्रातील विजेते पुढीलप्रमाणे आहेत: –
शेती कल्पकता: श्री. विजय गारगोटे, श्री. मयुर वाघ, श्री.भूषण निकम
नैसर्गिक शेती उपक्रम: श्री. नागेश नानवरे, श्री. विश्वनाथ होलगे, श्री. शरद बोंडे
महिला शेती – उद्योजिका पुरस्कार सुरेखा नंदकुमार जाधव, द्रौपदी संतोष कांगुलकर, राणी बाळासाहेब नाईक यांना देण्यात आला.























