मोशी प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड शहरातील सर्वांचे लाडके व्यक्तिमत्त्व सर्वांच्या मदतीला नेहमी धावून येणारे, समाजसेवक, दमदार नगरसेवक, मा. सभापती क्रीडा समिती पिंपरी चिंचवड महानगरपालिका.
श्री. लक्ष्मण सस्ते पाटील यांनी चैतन्य गोरक्षनाथ जगदाळे वय अकरा वर्षे या लहानग्याच्या लिव्हर ट्रान्स्प्लांट ऑपरेशन साठी मदत कार्यात स्वतः पुढे येऊन रोख रक्कम पन्नास हजार रुपये मदत केली व ऑपरेशन नंतर येणाऱ्या सर्व अडचणींमध्ये तुमच्याबरोबर आहे असे आश्वासन चैतन्य चे वडील गोरक्षनाथ सुदाम जगदाळे यांना दिले आहे. त्याबद्दल सस्ते साहेबांचे साई हिरा क्लासिक सोसायटी परिवारातर्फे व जगदाळे परिवारातर्फे तसेच कुलदीप इंगळे परिवारातर्फे खूप खूप आभार मानण्यात आले सस्ते साहेबांच्या हातून अशीच समाजसेवा, जनसेवा, वडीलधाऱ्यांची सेवा, गोरगरिबांची सेवा घडो हीच सदिच्छा. साहेब आम्ही सर्व नेहमी सदैव तुमच्याबरोबर आहोत. पुन्हा एकदा तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असे गौरवोद्गार सोसायटीच्या रहिवाशांनी श्री सस्ते यांच्याशी बोलताना व्यक्त केले.
चैतन्यला मदतीचे आवाहन आमदार महेश लांडगे यांनी केले होते त्याला लगेचच प्रतिसाद देत मा. क्रीडा सभापती श्री लक्ष्मण सस्ते पाटील यांनी चैतन्य ला सढळ हस्ते मदत केली.