पिंपरी प्रतिनिधी :-
पिंपरी मनपाचे आयुक्त शेखर सिंह सध्या त्यांच्या धडाडीच्या निर्णयांमुळे महाराष्ट्रात अल्पावधीतच लोकप्रिय झाले आहेत. त्या निर्णयांमुळे कामचुकार कर्मचारी, चुकीची माहिती देऊन फसवणूक करणारे चांगलेच धास्तावले आहेत.
महापालिकेचे कार्यकारी अभियंता पदावरुन पदानवत झालेले व सध्या उप अभियंता पदावर कार्यरत असणारे शिरीष पोरेड्डी यांनी खोटे जातप्रमाणपत्र देवून बढती मिळवली होती आणि महापालिकेची फसवणूक केली त्यामुळे शिरीष पोरेड्डी यांच्यावर फौजदारी दाखल करावी तसेच त्यांना बढती मिळाल्यापासून ते आजतागायत दिलेले फायदे त्यावर झालेला खर्च वसूल करण्यात यावा.
शिरीष पोरेड्डी यांनी अनुसुचित जमातीच्या प्रवर्गातून बढती मिळाल्या नंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने त्यांना कार्यकारी अभियंता पदावरुन उप अभियंता पदी पदावनत केले आहे. त्यांनी अनुसूचित जमाती ऐवजी विशेष मागास प्रवर्गाचे जात वैधता प्रमाणपत्र सादर केले त्यामुळे त्यांना पदानवत केले आहे. म्हणून शिरीष पोरेड्डी यांच्यावर लवकरात लवकर फौजदारी कारवाई करुन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांनी बढती मुळे घेतलेले फायदे (खर्च) लवकरात लवकर वसूल करण्यात यावे ही विनंती.




