पुणे प्रतिनिधी:- मोशी, बो-हाडेवाडी परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या २० वर्षांपासून मोशी ग्रामस्थांना आळंदी पोस्ट ऑफिसची सुविधा वापरावी लागत होती.
मोशी परिसरासाठी स्वतंत्र शहरी भागाशी जोडलेले पोस्ट कार्यालय आजपासून कार्यान्वित झाले आहे. त्याचे लोकार्पण निर्देशक डाक सेवा सिमरन कौर, यांच्या हस्ते पार पडले, या यावेळी, पुणे शहर पूर्व विभाग प्रवर अधीक्षक डाकघर गोपराजू सतीश, चिंचवड सुपर डाक निरीक्षक सी. एम. नदाफ, पोस्ट मास्तर जनरल पुणे रिजन मधुमिता दास, जनसंपर्क निरीक्षक के एस पारखी, यांच्यासह स्थानिक नागरिक उपस्थित होते.
वारंवार मागणी करूनही मोशी गावाला स्वतंत्र पिनकोड नसल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता या त्रासापासून नागरिकांची सुटका झाली आहे. मोशी पोस्ट ऑफिस सुरू झाल्यामुळे नागरिकांना पोस्टाच्या सुविधा उपलब्ध होणार आहे.
मोशी परिसरासाठी स्वतंत्र शहरी भागाशी जोडलेले पोस्ट कार्यालय आजपासून कार्यान्वित झाले आहे. सदर जागा वसंत बोऱ्हाडे यांनी भाडेतत्वावर उपलब्ध करून दिली त्यामुळे त्यांचे विशेष आभार.
शिरूर लोकसभा मतदार संघाचे खा.अमोल कोल्हे यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले अनेक वेळा केंद्र सरकारला पत्रव्यवहार केला, वारंवार संसदेत मागणी केली व अखेर मोशी गावासाठी नवीन पोस्ट ऑफिस सुरु केले याबद्दल नगरसेवक वसंत बोराटे यांनी पोस्ट खात्याचे आणि खासदार अमोल कोल्हे यांचे आभार मानले.
यावेळी नगरसेवक वसंत बोराटे म्हणाले की, मोशी परिसराला अनेक वर्षांपासून आळंदी पोस्ट ऑफीसला जोडले होते. याला ग्रामीण पिन कोड असल्यामुळे पत्रव्यवहारात अनेक अडचणी येत होत्या.
आता नवीन पोस्ट ऑफिस कार्यरत झाल्यामुळे नवीन पिनकोड 411070 देखील मिळाला असून परिसरातील नागरिकांची गैरसोय थांबणार आहे यामुळे नागरिकांना आनंद व्यक्त केला.




