पिंपरी प्रतिनिधी:-
भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश युवा मोर्चाच्या महामंत्रीपदी पिंपरी चिंचवड शहरातील युवा नेतृत्व तेजस्विनी राजाभाऊ दुर्गे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास आणि दिलेली जबाबदारी ही शहरासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे.
पक्ष संघटन, युवकांचे प्रश्न आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेल्या तेजस्विनी दुर्गे यांच्या कार्याची दखल घेत प्रदेश नेतृत्वाने त्यांना ही महत्त्वाची संधी दिली आहे.
ही नियुक्ती मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष मा. कृष्णराज महाडीक साहेब आणि विधान परिषद आमदार मा. अमितजी गोरखे साहेब यांच्या आशीर्वादाने आणि विशेष प्रयत्नातून झाली आहे.
तसेच भाजप पिंपरी चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष मा. शत्रुघ्न ( बापू ) काटे, आमदार मा. महेशदादा लांडगे, मा. आमदार शंकर जगताप, आमदार मा. उमाताई खापरे यांचे मोलाचे सहकार्य या नियुक्तीसाठी लाभले आहे.
“आज मला भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश महामंत्री या पदावर काम करण्याची संधी मिळाली, ती केवळ आणि केवळ प्रदेश नेतृत्व आणि स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासामुळे. त्याच बरोबर माझे वडील माजी नगरसेवक श्री. राजाभाऊ दुर्गे आणि आमच्या सर्वांचे आधारस्तंभ आदरणीय आमदार अमितदादा गोरखे यांचे मार्गदर्शन आणि साथ नेहमीच माझ्या पाठीशी राहिली आहे. या सर्व मान्यवरांचे मी मनापासून ऋण व्यक्त करते. पक्षाने माझ्यावर टाकलेला विश्वास मी सार्थ ठरवेन आणि मला दिलेल्या या संधीचे मी नक्कीच सोने करून दाखवेल, अशी ग्वाही देते.” असे यावेळी बोलताना तेजस्विनी म्हणाल्या.






























