चिंचवड प्रतिनिधी:-
पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ आणि ४ ऑक्टोबर २०२६ रोजी मारुती कंद स्केटिंग ग्राउंड भोसरी आणि PCNDA ग्राउंड भोसरी येथे रोड रेस या प्रकारात स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये सर्व शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, या स्पर्धेतील प्रोफेशनल इनलाइन स्केटिंग अंडर सेव्हंटिन या गटात कु. अवनीश राहुल भोईर याने दोन कास्य पदक मिळविले.
प्रोफेशनल इन लाईन स्केटिंग अंडर नाईंटीन या गटात एस बी पाटील कॉलेज रावेत येथील बारावी सायन्स शाखेचा विद्यार्थी कु. आयुष राकेश सायकर याने उल्लेखनीय कामगिरी करत द्वितीय स्थान प्राप्त करत चार रोप्य पदक पटकावले त्यांच्या या यशाबद्दल पिंपरी चिंचवड स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष श्री अशोक गुंजाळ सर यांनी त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच चिंचवडचे विद्यमान नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर यांनी देखील मुलांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.






























