चिंचवड प्रतिनिधी:-
झोपडपट्टी पुनवर्सन योजनेअंतर्गत वेताळनगर, चिंचवडगांव येथील एस. आर. प्रकल्प क्रिसल इलाईट एल.एल.पी या कंपनीस देण्यात आला आहे.सदर झोपडपट्टी मध्ये सदृश्य अहवालात १३१३ इतकी घरे होती. यापैकी महानगरपालिकेने बी.एस.यु.पी. अंतर्गत १००८ घराचे वाटप व २४ दुकानांचे वाटप केले आहे. आता फक्त ३०५ घराचे वाटप राहिले असताना संदर ‘क्रिसला इलाईट एल.एल. पी. कंपनीचे मालक सागर अगरवाल योनी ४७५ घराचे हस्तांतर बाकी असल्याचे दाखवून सदरचा जादा घरांचा चटई निर्देशांक ( टि.डी.आर.) मागितला आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून ही शासनाची आणि पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेची फसवणूक आहे.
वेताळनगर एस. आर.ए. प्रकल्पाची चौकशी होणे आवश्यक असून याची उच्चस्तरीय चोकशी करणे आवश्यक आहे. तसेच संबंधित कंपनीने जादा (टि. डी.आर) मिळविण्यासाठी सुरू केलेली प्रक्रीया त्वरित थांबविण्यात यावी ,अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त डॉ विजय सुर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.






























